मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: महिलांना 1500 रुपये थेट बँक खात्यात, किती कोटी महिलांना लाभ मिळणार?

By Jay
On: Saturday, July 6, 2024 10:08 AM
Apply Ladki Bahin Yojana

अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ थेट बँक खात्यात दरमहा 1500 रुपयांचा लाभ

महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana) सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरू झाली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अडीच कोटीं पेक्षा जास्त महिलांना लाभ थेट बँक खात्यात दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?

अर्ज प्रक्रिया

योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ‘नारीशक्ती दूत’ मोबाईल अ‍ॅप किंवा पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल. अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला
  • मतदान ओळखपत्र किंवा रेशनकार्ड
  • बँक खात्याचे पासबुकची झेरॉक्स प्रत
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशनकार्ड
  • योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

अर्ज प्रक्रिया Apply Ladki Bahin Yojana

  1. ‘नारीशक्ती दूत’ अ‍ॅप डाऊनलोड करा.
  2. मोबाईल नंबर टाकून अ‍ॅपमध्ये लॉगिन करा.
  3. प्रोफाईल भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. ‘महिलांच्या योजना’ या विभागात जाऊन ‘माझी लाडकी बहीण योजना’ निवडा.
  5. संपूर्ण अर्ज भरा आणि सबमिट करा.

पात्रतेचे निकष (Mukhyamantri Ladki Bahin Yojana Eligibility)

पात्रता

  1. अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  2. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अर्ज करू शकतात.
  3. 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिला अर्ज करू शकतात.
  4. एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
  5. अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.

अपात्रता

  1. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास.
  2. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत.
  3. सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असलेल्या महिला.
  4. इतर योजनेद्वारे 1500 रुपये जास्त लाभ घेत असलेल्या महिला.
  5. कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असल्यास.
  6. कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने असल्यास (ट्रॅक्टर सोडून).

जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

महिला ग्राहकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या जातील. बँकेतील अडचणी सोडवण्यासाठी बँक प्रतिनिधींना आदेश दिले जातील. तसेच, प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना महिलांना कोणतीच अडचण येणार नाही, याची काळजी घेण्याबाबत चर्चा झाली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

Chief Minister Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana योजनेचा लाभ

महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, या योजनेमुळे अनेक महिलांचे स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले आहे. आता, या महिलांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे थेट 1500 रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ अडीच कोटीं पेक्षा जास्त महिलांना मिळणार आहे.

mazi ladki bahin yojana online apply मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र नाही? मग असा भरा अर्ज

अ‍ॅप डाऊनलोड लिंक

Maharashtra Nari Shakti App Download

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment