Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana योजनेबद्दल अधिक माहिती आणि योजनेसंबंधी असलेल्या प्रश्नांची उत्तरे
मुंबई: Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana All Details महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. योजनेबद्दल अधिक माहिती आणि योजनेसंबंधी असलेल्या प्रश्नांची उत्तरे येथे दिली आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?
राज्यातील महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ Mazi Ladki Bahin Yojana योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे, राज्यातील सर्व गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
योजना कधी सुरू झाली?
2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेची घोषणा केली. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
किती रक्कम मिळणार?
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. यामुळे वार्षिक 18000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
कोणत्या महिलांना लाभ मिळणार?
निराधार,अविवाहित, विधवा आणि गरीब कुटुंबातील सर्व महिला या योजनेसाठी पात्र असतील. अर्जदार महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.पिवळ आणि केशरी कार्ड धारकांना उत्पन्न दाखला आवश्यक नाही
अर्ज कसा करावा?
इच्छुक महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्जासाठी ‘नारीशक्ती दूत’ अॅप डाऊनलोड करून अर्ज भरता येऊ शकतो.
अॅप डाऊनलोड करा
नारीशक्ती दूत अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया
- अॅप डाऊनलोड करून ओपन करा.
- तीन स्लाइड्स पुढे जाऊन ‘Done’ या बटणावर क्लिक करा.
- मोबाईल नंबर टाका आणि ‘I Accept’ या बटणावर क्लिक करा.
- ‘लॉग इन’ बटणावर क्लिक करून पुढे जा.
- प्रोफाईल तयार करून आवश्यक माहिती भरा.
- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पर्यायावर क्लिक करा.
- महिलेचे नाव, वडील किंवा पतीचे नाव, जन्मतारीख, जिल्हा, गाव/शहर, पिनकोड, पत्ता आणि मोबाईल नंबर ही माहिती भरा.
- शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळत असल्यास ‘हो’ किंवा ‘नाही’ यावर क्लिक करा.
- बँकेची माहिती भरा: बँकेमध्ये तुमचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड.
- कागदपत्र अपलोड करा: आधारकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, मोबाईल क्रमांक (आधारशी जोडलेला), जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो.
आवश्यक कागदपत्रे
योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- उत्पन्नाचा दाखला, पिवळ आणि केशरी कार्ड धारकांना उत्पन्न दाखला आवश्यक नाही
- वयाचा दाखला
- मोबाईल क्रमांक (आधारशी जोडलेला)
- जात प्रमाणपत्र
- रेशनकार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म
हे ही वाचा>> ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना: आता करा “नारी शक्ती मोबाईल अँप” मधून नोंदणी
फॉर्म कसा डाउनलोड करायचा?
सर्वप्रथम, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या Ladki Bahin Yojna Form Download च्या लिंकवर क्लिक करा. आता तुमच्यासमोर फॉर्म PDF स्वरूपात उघडेल. तुम्ही येथे डाउनलोड वर क्लिक करून फॉर्म PDF स्वरूपात मिळवू शकता.
हे ही वाचा>> मोबाईलवरून लाडकी बहिण योजनेचा फॉर्म कसा भरावा: जाणून घ्या Ladki Bahin Yojana Nari Shakti App