Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली, नवीन नियम जाहीर

Chief Minister Ladki Bahin Yojana

राज्यातील महिलांसाठी आर्थिक मदत योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा १५०० रुपये मिळणार आहेत. ही योजना जाहीर झाल्यापासूनच राज्यभरात महिलांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सरकारने अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे आणि काही अटी-शर्थींमध्ये बदल केले आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली

राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची Apply Ladki Bahin Yojana शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवली आहे. आधी ही तारीख 15 जुलै 2024 होती, परंतु महिला आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार ही मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

योजनेत केलेले महत्त्वाचे बदल

Chief Minister Ladki Bahin Yojana योजनेच्या पात्रतेमध्ये आणि अर्ज प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामुळे अर्ज भरणं आता आणखी सोपं झालं आहे.

अटी-शर्थींमध्ये बदल

  • आधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नाही: जर लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या कागदपत्रांपैकी कोणतंही ग्राह्य धरलं जाईल.
  • उत्पन्नाचा दाखला: 2 लाख 50 हजार रुपयांचा उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्न दाखला देण्याची आवश्यकता नाही.
  • वय: लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष ऐवजी 21 ते 65 वर्ष असा करण्यात आला आहे.
  • शेतीची अट: 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
  • मोबाईल अॅपद्वारे अर्ज: अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र नारी शक्ती अ‍ॅप डाउनलोड करा NariShakti App Download

अर्ज प्रक्रिया

योजनेसाठीचा अर्ज पोर्टल, मोबाईल अॅप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरता येईल. अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधारकार्ड
  • रेशनकार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा फोटो
  • अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
  • लग्नाचं प्रमाणपत्र

पात्रता आणि अपात्रता

पात्रता (Eligible For Mukhyamantri Ladki Bahin Yojana?):

  • महाराष्ट्र रहिवासी
  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे
  • वय 21 ते 65 वर्ष

अपात्रता:

  • 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
  • घरात कोणी Tax भरत असेल तर
  • कुटुंबातील कोणी जर सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
  • कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
  • कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल (ट्रॅक्टर सोडून)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

mazi ladki bahin yojana online apply मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र नाही? मग असा भरा अर्ज

Chief Minister Ladki Bahin Yojana महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन सरकारने केले आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज पूर्ण केलेल्या महिलांना 1 जुलै पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojna Form Download Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

Leave a Comment