PM Ladka Bhau Yojana: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मांडला. Budget 2024 हा रोजगार आणि कौशल्य विकासावर केंद्रित असून, त्यात अनेक महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
रोजगारासाठी प्रोत्साहन योजना PM Ladka Bhau Yojana
Budget 2024 मध्ये रोजगार वाढवण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या योजनांच्या माध्यमातून पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे.
योजना A: पहिल्यांदा नोकरी लागणाऱ्यांसाठी First Timers
A direct benefit transfer (DBT) of one month’s salary, up to Rs 15,000, will be provided in three instalments.
योजना A अंतर्गत, पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना एका महिन्याचा वेतन (15,000 रुपयांपर्यंत) तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केला जाईल. या योजनेचा फायदा 2.1 कोटी तरुणांना होईल.
पात्रता आणि लाभ PM Ladka Bhau Yojana Eligibility
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की एक महिन्याचे वेतन (15,000 रुपयांपर्यंत) तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केले जाईल. या लाभासाठी पात्रता मर्यादा 1 लाख रुपये प्रति महिना वेतन ठरविण्यात आली आहे, आणि याचा फायदा 2.1 कोटी तरुणांना होईल. या लाभासाठी नोकरी करणाऱ्या कर्मचार्यांची नोंदणी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत (EPFO) असणे आवश्यक आहे.
योजना B: उत्पादन क्षेत्रातील रोजगार वाढ Job Creation in Manufacturing
उत्पादन क्षेत्रात रोजगार वाढवण्यासाठी योजना B अंतर्गत, पहिल्यांदा नोकरीला लागणारे तरुण आणि त्यांची कंपनी यांना भविष्य निर्वाह निधीच्या हिशेबाने प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. या योजनेचा फायदा 30 लाख तरुणांना होईल. Direct Incentive to both employee and employer as per EPFO contribution in the first 4 years of employment
योजना C: रोजगार आणि कौशल्य विकास Support to Employers
Reimbursement up to Rs 3,000 per month for 2 years towards EPFO contributions for each additional employee (PM Ladka Bhau Yojana).
रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी योजना C अंतर्गत, अतिरिक्त रोजगाराच्या EPFO contributions योगदानासाठी सरकार 3,000 रुपये प्रति महिना दोन वर्षांपर्यंत परत देईल. या योजनेचा फायदा 50 लाख तरुणांना होईल.
महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद
Budget 2024 मध्ये महिलांच्या रोजगारात उच्च सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मॉडेल कौशल्य कर्ज योजना सुधारणार आहे. ही योजना दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना मदत करेल.
MSME योजनेसाठी तरतूद
MSME हमी योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांपर्यंतची कर्जे उपलब्ध होतील. MUDRA कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.
Ladki Bahin Yojana Form Status Pending: तुमचा पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडिंग? मग हे वाचा
युवा विकासासाठी अन्य योजना PM Ladka Bhau Yojana
Budget 2024 खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ई-कॉमर्स निर्यात केंद्र तयार केले जाईल आणि तरुणांच्या इंटर्नशिपसाठी सर्वसमावेशक योजना आणली जाईल. टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप दिली जाईल आणि 100 शहरांमध्ये औद्योगिक पार्क विकसित केले जातील.