Namo Shetkari Yojana: PM मोदी जळगाव दौऱ्यावर, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! “नमो शेतकरी महासन्मान योजना” चा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी 2041 कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा ४ था हप्ता मोदीजी जळगाव मधून वितरित करू शकतात.
“नमो शेतकरी महासन्मान योजना” काय आहे?
Namo Shetkari Yojana ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “पीएम किसान सन्मान योजना” च्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे, शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा केले जातात. राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
हे हि वाचा: Namo Shetkari Yojana 4th Installment Date 2024: 2 हजार कोटी मंजूर, तारीख जाहीर
चौथ्या हप्त्यासाठी 2041 कोटी रुपये मंजूर
राज्य सरकारने “नमो शेतकरी महासन्मान योजना” च्या चौथ्या हप्त्यासाठी 2041 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापूर्वी या Namo Shetkari Yojana योजनेसाठी 5512 कोटी रुपये वितरित केले आहेत. आतापर्यंत तीन हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.
जळगावातून मोदीजी पाठवणार
25 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावमध्ये “लखपती दीदी” कार्यक्रमासाठी येणार आहेत. या कार्यक्रमात ते 11 लाख महिलांना प्रमाणपत्रे वितरित करतील. असे मानले जात आहे की, याच कार्यक्रमात “नमो शेतकरी महासन्मान योजना” च्या चौथ्या हप्त्याची घोषणा देखील करू शकतात.
२५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा
२५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते जळगावमध्ये ‘लखपती दीदी’ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात ११ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ योजनेअंतर्गत प्रमाणपत्रे वाटप केली जातील. Namo Shetkari Yojana 4th Installment हा कार्यक्रम जळगाव विमानतळाच्या समोरील विस्तीर्ण जागेवर आयोजित करण्यात आला आहे.
‘लखपती दीदी’ योजना आणि ‘नमो ड्रोन दीदी’ योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने घेतलेल्या पुढाकाराचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. महिलांच्या स्वयं-साहाय्य समूहांच्या वाढीसाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी या योजनांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले आहे.
हे हि वाचा: PM Kisan Yojana 18th Installment पीएम किसान योजना: कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?
“नमो शेतकरी महासन्मान योजना” ची महत्त्वाची भूमिका
“नमो शेतकरी महासन्मान योजना” Namo Shetkari Yojana ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी मदत ठरली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण होत आहे आणि ते आपल्या शेती व्यवसायाला अधिक चांगल्या प्रकारे चालू ठेवू शकतात.
हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Form Status Pending: तुमचा पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडिंग? मग हे वाचा
Namo Shetkari Yojana Beneficiary Status तपासण्याची सुविधा
शेतकऱ्यांना त्यांच्या Namo Shetkari Yojana योजनेचा स्टेटस तपासण्यासाठी एक सोपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary या वेबसाइटवर जाऊन मोबाइल नंबर किंवा रेजिस्ट्रेशन नंबरचा वापर करून आपला स्टेटस तपासू शकतात.
Namo Shetkari Yojana Official Website– https://nsmny.mahait.org/
हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Check Payment Status: लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठे जमा होतील?