मुंबई, ऑगस्ट २०: राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत चौथा हप्ता लवकरच देण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी तब्बल 2041.25 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. ‘namo shetkari yojana 4th installment date 2024’ बाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना म्हणजे काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’च्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना २०२३-२४ या वर्षी सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम राज्यातील शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ अंतर्गत मिळणाऱ्या ६,००० रुपयांव्यतिरिक्त असते. म्हणजेच, या दोन्ही योजनांमधून राज्यातील शेतकऱ्यांना एकूण १२,००० रुपयांची मदत मिळते.
हे हि वाचा: PM Kisan Yojana 18th Installment पीएम किसान योजना: कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?
आतापर्यंत तीन हप्ते वितरित
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीसाठी पहिला हप्ता, ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीसाठी दुसरा हप्ता आणि डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीसाठी तिसरा हप्ता देण्यात आला आहे.
चौथा हप्ता एप्रिल-जुलै २०२४ साठी
आता चौथा हप्ता एप्रिल ते जुलै २०२४ या कालावधीसाठी देण्यात येणार आहे. ‘namo shetkari yojana 4th installment date 2024’ बाबत राज्य सरकारकडून लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे. राज्य सरकारने चौथ्या हप्त्यासाठी 2041 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा हप्ता एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी वितरित केला जाणार आहे. योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे, आणि त्यानंतर हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
योजनेसाठी एकूण ५५१२ कोटी वितरित
राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी‘ योजनेसाठी आतापर्यंत एकूण ५५१२ कोटी रुपये वितरित केले आहेत. यात चौथ्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेले २०४१.२५ कोटी रुपये आणि प्रशासकीय खर्चासाठी मंजूर करण्यात आलेले २०.४१ कोटी रुपये यांचा समावेश आहे.
हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Form Status Pending: तुमचा पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडिंग? मग हे वाचा
शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्वाचा निर्णय
Namo Shetkari Yojana 4th Installment Date 2024 राज्य सरकारने या योजनेसाठी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी हे अनुदान खूपच उपयुक्त ठरणार आहे. नमो शेतकरी महासन्मान योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे त्यांच्या शेती व्यवसायाला चालना मिळेल.
हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Check Payment Status: लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठे जमा होतील?