“CM Ladki Bahin Yojna” महिलांना आता हा फॉर्म घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे
मुंबई: महायुती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ CM Ladki Bahin Yojna ची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यभरातील सरकारी कार्यालयामध्ये महिलांची गर्दी वाढली आहे. परंतु, महिलांना आता हा फॉर्म घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कशासाठी?
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे. महिलांना त्यांचे दरमहा खर्चासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojna Form Download
अर्ज भरण्याची प्रक्रिया
फॉर्ममध्ये आवश्यक माहिती
- नाव आणि पत्ता: महिलांनी आपले पूर्ण नाव, पत्ता, जन्म ठिकाण, पिनकोड ही माहिती फॉर्ममध्ये भरावी लागेल.
- बँक तपशील: महिलांनी त्यांच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक नमूद करावा. तसेच बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खात्याचा क्रमांक, आणि IFSC कोडही भरावा लागेल.
- व्यक्तिगत तपशील: महिलांनी वैवाहिक स्थितीची माहिती फॉर्ममध्ये देणे आवश्यक आहे. याशिवाय, अन्य कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असल्यास, त्या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेसह तपशील भरावा लागेल.
ऑनलाईन फॉर्म कसा भराल?
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर जा.
- तिथून फॉर्मची पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
- डाऊनलोड केलेल्या फाईलमध्ये आवश्यक ती माहिती भरा.
- भरलेला फॉर्म पुन्हा संकेतस्थळावर अपलोड करा.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून सबमिट करा.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
- लग्नाचे प्रमाणपत्र
पात्रता निकष
CM Ladki Bahin Yojna पात्र कोण?
- महाराष्ट्रातील रहिवासी महिला
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
- वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा कमी असावे
अपात्र कोण?
- वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त असणारे कुटुंब
- कुटुंबातील कोणी कर भरत असेल
- कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी करत असेल किंवा निवृत्ती वेतन घेत असेल
- कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) असेल
ऑनलाईन अर्ज करण्याच्या सुविधा
CM Ladki Bahin Yojna महिलांना अर्ज भरण्यासाठी विविध सुविधा केंद्र उपलब्ध आहेत. अर्ज पोर्टल, मोबाइल अँप, सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाईन अर्ज भरता येऊ शकतो. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा उपलब्ध आहे.