Ladki Bahin Yojana January Installment Date Maharashtra: राज्यातील महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) जानेवारी महिन्याचा हफ्ता वितरीत करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
जानेवारी महिन्याचा हफ्ता कधी मिळणार?
Ladki Bahin Yojana January Installment Date Maharashtra: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 26 जानेवारी 2025 पूर्वी 1500 रुपयांचा हफ्ता जमा केला जाणार आहे. आर्थिक नियोजन पूर्ण झाल्याची माहिती अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला मिळाली असून, नियोजित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन ते चार दिवसांत जमा होईल, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
योजनेच्या निधीची तरतूद
योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य मंत्रिमंडळाने एकूण 3690 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. याचा उपयोग जानेवारी Ladki Bahin Yojana January Installment Date Maharashtra महिन्यातील हफ्ता वितरीत करण्यासाठी होणार आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देत मंत्री तटकरे म्हणाल्या की, “लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे.”
योजनेच्या अंमलबजावणीतील सुधारणा
महिला व बालविकास विभागाने योजनेतील डुप्लिकेशन टाळण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. मागील लाभार्थ्यांमध्ये 1-2 टक्के घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या महिला अनेक योजनांचा लाभ घेत असल्याने काहींनी स्वेच्छेने योजनेतून माघार घेतली आहे.

हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Form Status Pending: तुमचा पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडिंग? मग हे वाचा
योजनेचा स्टेटस कसा तपासावा?
लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) स्टेटस तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल: https://testmmmlby.mahaitgov.in/.
- स्टेटस पाहण्यासाठी प्रक्रियेचे टप्पे:
- वेबसाईटवर ‘लाभार्थ्यांचा स्टेटस’ पर्याय निवडा.
- मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका.
- कॅप्चा कोड भरून ओटीपीद्वारे स्टेटस पाहा.
लाडकी बहीण योजना: नवीन अर्थसंकल्पाचा प्रभाव
Ladki Bahin Yojana January Installment Date Maharashtra फेब्रुवारी महिन्याच्या लाभांसाठीही तयारी सुरू असून, मार्चमध्ये सादर होणाऱ्या नवीन अर्थसंकल्पानंतर योजनांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी केली जाईल, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.
Ladki Bahin Yojana अंतर्गत राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
हे हि वाचा: Farmers Schemes: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मंजूर केल्या ७ मोठ्या योजना, सविस्तर वाचा