Ladki Bahin Yojana: ठरलं तर, या दिवशी येणार पैसे खात्यात

By Jay
On: Wednesday, July 10, 2024 4:51 AM
CM Ladki Bahin Scheme List

मुंबई: राज्यात सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ योजनेची प्रतिक्षा संपली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. 15 ऑगस्ट रोजी या योजनेची 1500 रुपयांची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होईल.

CM Ladki Bahin Scheme लाडकी बहीण योजनेची आवश्यकता आणि उद्दिष्ट

राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे, जी त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि पात्रता निकष

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू झाली आहे. सुरुवातीला पात्रतेचे निकष स्पष्ट नसल्याने गोंधळ उडाला होता, मात्र आता निकष स्पष्ट झाल्याने महिलांची गर्दी सरकारी कार्यालयांमध्ये होत आहे. अर्ज भरण्यासाठी महिलांना आधार कार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, आणि लग्नाचे प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे आवश्यक आहेत.

अर्ज प्रक्रिया आणि मुदतवाढ

अर्ज करण्यासाठी महिला ऑनलाईन पोर्टल, मोबाइल अॅप, सेतू सुविधा केंद्र, किंवा अंगणवाडी केंद्रांचा वापर करू शकतात. सुरुवातीला अर्ज भरण्याची मुदत 15 जुलै होती, परंतु महिलांची गर्दी पाहता ती मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

लाभार्थ्यांची यादी आणि पैसे जमा होण्याची तारीख

16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी mukhyamantri majhi ladki bahin yojana list प्रसिद्ध केली जाईल आणि 1 ऑगस्टला अंतिम यादी जाहीर केली जाईल. 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा केली जाईल.

CM Ladki Bahin Scheme

योजनेचा प्रभाव

CM Ladki Bahin Scheme मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील आणि अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेमुळे महिलांना घरखर्चासाठी थोडीफार मदत होईल आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment 2024: या दिवशी मिळणार पहिले 1500 रुपये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment