पंतप्रधान जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत विमा कवच मर्यादा वाढविण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने 23 जुलै 2024 रोजी सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पात Union Budget 2024 मोठ्या बदलांची तयारी केली आहे. या अर्थसंकल्पात आयुष्यमान भारत – पंतप्रधान जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत विमा कवच मर्यादा वाढविण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
विमा कव्हरेज मर्यादेत होणार वाढ
पीटीआयच्या वृत्तानुसार, केंद्र सरकार Ayushman Bharat PMJAY योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आणि विमा रक्कम वाढविण्याचा विचार करत आहे. सध्या या योजनेत 5 लाख रुपये प्रति कुटुंब प्रति वर्ष विमा कवच उपलब्ध आहे, ज्याचे 10 लाख रुपये करण्याचा विचार आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना महागड्या उपचारांसाठी अधिक आर्थिक सुरक्षा मिळणार आहे.
Union Budget 2024 अर्थसंकल्पातील बदल
2024 च्या अंतरिम अर्थसंकल्पात Ayushman Bharat PMJAY योजनेसाठी 7,200 कोटी रुपये तर आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशनसाठी (PM-ABHIM) 646 कोटी रुपये राखीव ठेवले होते. या वाढीमुळे 12 कोटी कुटुंबांना आरोग्य कवच मिळणार आहे. 70 वर्षांवरील नागरिकांसाठीही ही योजना विस्तारित करण्याचा विचार आहे, ज्यामुळे अतिरिक्त 4-5 कोटी लाभार्थी या योजनेत समाविष्ट होऊ शकतात.
प्रस्तावाला अंतिम स्वरुप
येत्या तीन वर्षांत Ayushman Bharat PMJAY अंतर्गत लाभार्थी संख्या दुप्पट करण्यावर भर देण्यात येणार आहे. देशातील अधिक लोकसंख्येला या निर्णयाचा फायदा होईल. महागड्या उपचारांसाठी कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या लोकांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरेल. विमा कव्हरेजची रक्कम 10 लाख रुपये करण्याचा विचार सरकार गांभीर्याने करत आहे.
सरकारच्या तिजोरीवर वाढणार भार
Union Budget 2024 जर आयुष्यमान भारत PMJAY योजनेतंर्गत विमारक्कम वाढविण्याचा निर्णय झाला तर सरकारच्या तिजोरी वर 12708 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. त्यामुळे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सरकारला बजेटमध्ये मोठा बदल करावा लागणार आहे. 70 वर्षांवरील नागरिकांसह जवळपास 4-5 कोटी लाभार्थी या योजनेत सहभागी होऊ शकतात.
Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana