Ladki Bahin Yojana: दिशाभूल करणाऱ्या माहितीबाबत इशारा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिलं जातं. सरकारकडून ही रक्कम डीबीटी (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

दिशाभूल करणाऱ्या माहितीबाबत इशारा

समाज माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना संदर्भात दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचं समोर आलं आहे. महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केलं आहे की, या Ladki Bahin Yojana योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. MLA अदिती तटकरे यांनी याबाबत जनतेला अपप्रचाराला बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे.

हे हि वाचा: Farmers Schemes: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मंजूर केल्या ७ मोठ्या योजना, सविस्तर वाचा

सहाव्या हफ्त्याबाबत महिलांची प्रतीक्षा

महिलांना लाडकी बहिण योजनेच्या सहाव्या हफ्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दिवाळीपूर्वी सरकारने Ladki Bahin Yojana चौथ्या व पाचव्या हफ्त्याचे ₹3000 एकत्रितपणे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले होते. मात्र, सहाव्या हफ्त्याच्या रक्कमेचं वितरण कधी होईल, याबाबत चर्चांना उधाण आहे.

सहाव्या हफ्त्याचे वितरण कधी होणार?

महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर Ladki Bahin Yojana योजनेच्या सहाव्या हफ्त्याचे ₹1500 लवकरच जमा केले जातील, अशी शक्यता आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस रक्कम वाटपाची प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

योजना निधीचा आढावा

लाडकी बहिण योजनेचा निधी आतापर्यंत सुमारे ₹17,000 कोटींवर पोहोचला आहे. महिलांना नियमित आर्थिक सहाय्य देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा सरकारचा हेतू आहे. निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीने या रकमेचा मासिक निधी ₹2100 करण्याचं आश्वासन दिलं होतं.

योजनेचा स्टेटस कसा तपासाल?

लाडकी बहिण योजनेचा स्टेटस तपासण्यासाठी लाभार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी:
https://testmmmlby.mahaitgov.in/

  1. वेबसाईटवर स्टेटस ऑप्शन निवडा.
  2. आपला मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर प्रविष्ट करा.
  3. कॅप्चा कोड भरा आणि मोबाईल ओटीपी टाकून सबमिट करा.
  4. तुमचं स्टेटस लगेच पाहता येईल.
Ladki Bahin Yojana

महिलांसाठी योजना महत्वाची का?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. सरकारच्या या प्रयत्नामुळे महिलांना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळतं.

  • Ladki Bahin Yojana सहाव्या हफ्त्याच्या वाटपासाठी आता लाभार्थी महिलांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी.
  • सोशल मीडियावरील कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी पडू नये.
Ladki Bahin Yojana New Updates
Ladki Bahin Yojana New Updates

हे हि वाचा: Lakhapati Didi Yojana: महिलांना स्वावलंबनाची संधी

Leave a Comment