५०,००० बेसिक सैलरीवर UPS Calculation नुसार निवृत्तीनंतर मिळणार एवढं पेन्शन!

नवी दिल्ली: UPS केंद्र सरकारने नोकरदारांसाठी एक नवी पेन्शन योजना जाहीर केली आहे जी सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन देईल. ही योजना म्हणजे यूनिफाइड पेन्शन योजना (Unified Pension Scheme – UPS). ही योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. या योजनेअंतर्गत, निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या १२ महिन्यांच्या सरासरी बेसिक सैलरीच्या ५०% रक्कम पेन्शन म्हणून मिळेल. ही योजना नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) सोबत चालणार आहे. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना किमान २५ वर्षे सेवा करणे आवश्यक असेल.

UPS(Unified Pension Scheme) म्हणजे काय?

Unified Pension Scheme यूनिफाइड पेन्शन योजना ही केंद्र सरकारची एक नवीन पेन्शन योजना आहे जी सरकारी नोकरदारांना निश्चित पेन्शन देण्यासाठी आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या १२ महिन्यांच्या सरासरी बेसिक सैलरीच्या ५०% रक्कम पेन्शन स्वरूपात मिळेल. यासोबतच, कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला फॅमिली पेन्शन (Assured Family Pension) देण्याची तरतूद देखील या योजनेत आहे.

कोणाला मिळेल या Unified Pension Scheme योजनेचा लाभ?

Unified Pension Scheme ही योजना केंद्र सरकारच्या सुमारे २३ लाख कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. जर राज्य सरकारे ही योजना स्वीकारली तर त्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळू शकेल.

हे हि वाचा: कापूस सोयाबीन उत्पादकांना दिलासा: हेक्टरी ₹५ हजारांचे अर्थसहाय्य जाहीर

UPS Calculation: ५०,००० बेसिक सैलरीवर किती मिळेल पेन्शन?

समजा तुमची सरासरी मासिक बेसिक सैलरी ५०,००० रुपये आहे. तर तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा २५,००० रुपये पेन्शन मिळेल (५०,००० चा ५०%). याशिवाय, महागाई भत्ता (DR) वेगळा मिळेल.

UPS अंतर्गत कुटुंबाला किती मिळेल पेन्शन?

जर कर्मचाऱ्याचे निधन झाले आणि त्यांची पेन्शन ३०,००० रुपये असेल तर त्यांच्या कुटुंबाला दरमहा १८,००० रुपये फॅमिली पेन्शन मिळेल. कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर कुटुंबाला त्यांच्या पेन्शनच्या ६०% रक्कम मिळते.

हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Form Status Pending: तुमचा पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडिंग? मग हे वाचा

UPS की NPS: कोणता पर्याय निवडावा?

UPS-Unified Pension Scheme आणि NPS या दोन्ही योजनांमध्ये योगदान समान आहे – म्हणजेच १०% बेसिक सैलरी. पण, सरकार UPS मध्ये १४% वरून १८.५% योगदान देणार आहे. यामुळे, UPS मध्ये निवृत्तीवेतन जास्त मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे: एकदा तुम्ही UPS निवडला की तुम्ही NPS मध्ये जाऊ शकत नाही आणि उलट देखील.

हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Check Payment Status: लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठे जमा होतील?

टीप: ही माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. अधिक माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Comment