Nari Shakti Doot नारीशक्ती दूत नोंदणी पोर्टल लॉगिन: संपूर्ण मार्गदर्शन
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण’ योजना जाहीर केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना ‘नारीशक्ती दूत‘ ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. परंतु, अनेक महिलांना या अॅपद्वारे नोंदणी करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या लेखात, आपण नारीशक्ती दूत नोंदणी कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
नारीशक्ती दूत नोंदणी प्रक्रिया
स्टेप १: ॲप डाऊनलोड आणि इंस्टॉल
सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून ‘Nari Shakti Doot’ ॲप डाऊनलोड करावे लागेल. हे राज्य सरकारने तयार केलेले अधिकृत ॲप आहे. ॲप डाऊनलोड करून इंस्टॉल केल्यानंतर, ॲप ओपन करून त्यावरील सूचना वाचाव्यात.
स्टेप २: मोबाईल नंबर नोंदणी
मोबाईल नंबर टाकून, अटी व शर्ती स्वीकाराव्यात. लॉग-इन बटणावर क्लिक केल्यानंतर, आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकून Verify OTP बटणावर क्लिक करावे. त्यानंतर, प्रोफाईल पूर्ण करणे आवश्यक आहे.
स्टेप ३: नोंदणी प्रक्रिया
नोंदणी प्रक्रियेत अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव, ई-मेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार (सामान्य महिला, बचतगट अध्यक्ष/सचिव/सदस्य, गृहिणी, ग्रामसेवक) निवडावा लागेल. त्यानंतर, अपडेट बटणावर क्लिक करून नवीन पेज ओपन करावे.
स्टेप ४: वैयक्तिक माहिती
अर्जदार महिलेची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. यात संपूर्ण नाव, पती किंवा वडिलांचे नाव, जन्म दिनांक, पत्ता, जन्म ठिकाण, जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड, मोबाईल क्रमांक, आणि आधार क्रमांक टाकावा लागेल.
स्टेप ५: बँक खाते तपशील
शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेतात का याबद्दल माहिती द्यावी लागेल. याशिवाय, बँकेचे पूर्ण नाव, खाते धारकाचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, आणि आधार क्रमांक बँक खात्याशी जोडले आहे का हेही नमूद करावे लागेल.
स्टेप ६: कागदपत्र अपलोड
नोंदणी प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यात आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, आणि अर्जदाराचा फोटो यांचा समावेश आहे.
हमीपत्र स्वीकार आणि फॉर्म सबमिट
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, Accept हमीपत्र बटणावर क्लिक करावे. त्यानंतर, सर्व माहिती तपासून, फॉर्म सबमिट करावा. फॉर्म सबमिट केल्यानंतर, अर्जाची स्थिती तपासण्यासाठी अर्जाचा क्रमांक दिला जाईल.
मित्रांनो, अशा प्रकारे ‘नारीशक्ती दूत’ nari shakti doot link नोंदणी पोर्टल लॉगिन प्रक्रिया पूर्ण होते. या मार्गदर्शनाने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत अशी अपेक्षा आहे.