Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा वाचा पूर्ण माहिती, शासन निर्णय आला

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra: महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वधर्मीय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन यात्रेची संधी देण्यासाठी “मुख्यमंंत्री तीर्थ दर्शन योजना” राबवण्यास मान्यता दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून, ज्येष्ठ नागरिकांना भारतातील प्रमुख तीर्थस्थळांना भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

योजना आणि उद्दिष्टे

मुख्यमंंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र राज्याच्या समाजकल्याण विभागाने जाहीर केली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक आणि अध्यात्मिक पातळीवर प्रोत्साहन देणे आहे. जीवनभर कष्ट करून वयोमानानुसार त्यांच्या आयुष्यातील सर्व साधारण, आर्थिक अडचणीमुळे ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ही योजना आहे.

योजनेची व्याप्ती

मुख्यमंंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत महाराष्ट्र आणि भारतातील प्रमुख तीर्थस्थळे समाविष्ट आहेत. या तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट “अ” आणि “ब” मध्ये दिली जाईल. तीर्थस्थळांची संख्या वाढवता किंवा कमी करता येईल. प्रत्येक पात्र व्यक्तीला या योजनेचा एकदाच लाभ घेता येईल आणि यात्रेसाठी प्रती व्यक्ती जास्तीत जास्त ३०,००० रुपये खर्च करण्यात येतील. यात प्रवास, भोजन, आणि निवास समाविष्ट आहेत.

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra पात्रता आणि अपात्रता

पात्रता:

  1. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. लाभार्थी ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा असावा.
  3. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

अपात्रता:

  1. ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत.
  2. सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या स्थायी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय.
  3. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे.
  4. प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नसणारे ज्येष्ठ नागरिक.

आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंंत्री तीर्थ दर्शन योजना (Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra) अंतर्गत लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:

  1. ऑनलाइन अर्ज.
  2. आधार कार्ड/रेशन कार्ड.
  3. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र.
  4. उत्पन्नाचा दाखला.
  5. वैद्यकीय प्रमाणपत्र.
  6. पासपोर्ट आकाराचा फोटो.
  7. नातेवाईकाचा मोबाइल क्रमांक.
  8. अटी व शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र.

योजना अंमलबजावणी

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra योजना अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारने अधिकृत पर्यटक कंपन्यांना नियुक्त केले आहे. IRCTC आणि नोंदणीकृत कंपन्यांद्वारे रेल्वे व बस प्रवासाचे आयोजन करण्यात येईल. जिल्हास्तरीय समिती प्रवाशांची निवड करेल. प्रत्येक प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अधिक अर्ज आल्यास लॉटरीद्वारे निवड केली जाईल. निवड झालेल्या प्रवाशांची यादी जिल्हास्तरीय कार्यालये आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून जाहीर केली जाईल.

प्रवास प्रक्रिया

  1. निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांचेकडे सुपूर्द केली जाईल.
  2. अधिकृत पर्यटक कंपनी प्रवासाचे आयोजन करेल.
  3. राज्य सरकार प्रवासाच्या सुरक्षा आणि आवश्यक सुविधा पुरवेल.
  4. सर्व प्रवाशांनी निश्चित स्थळावर पोहोचणे आवश्यक आहे.

प्रवाशांची जबाबदारी

  1. प्रवासादरम्यान कोणतेही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ नेण्यास मनाई आहे.
  2. राज्याची/देशाची प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
  3. प्रवाशांनी अधिकृत संपर्क अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
  4. धार्मिक आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.

भारतातील तीर्थस्थळे Mukhyamantri Tirth Darshan Yojana List of pilgrimage sites

अ. क्र.मंदिराचे नावस्थान
1.वैष्णोदेवी मंदिरकटरा, जम्मू आणि काश्मीर
2.अमरनाथ गुहा मंदिरजम्मू आणि काश्मीर
3.सुवर्ण मंदिरअमृतसर, पंजाब
4.अक्षरधाम मंदिरदिल्ली
5.श्री दिगंबर जैन लाल मंदिरदिल्ली
6.श्री लक्ष्मीनारायण मंदिरदिल्ली
7.बद्रीनाथ मंदिरचमोली, उत्तराखंड
8.गंगोत्री मंदिरउत्तरकाशी, उत्तराखंड
9.केदारनाथ मंदिररुद्रप्रयाग, उत्तराखंड
10.नीलकंठ महादेव मंदिरऋषिकेश, उत्तराखंड
11.यमुनोत्री मंदिरउत्तरकाशी, उत्तराखंड
12.बैद्यनाथ धामदेवघर, झारखंड
13.काशी विश्वनाथ मंदिरवाराणसी, उत्तर प्रदेश
14.इस्कॉन मंदिरवृंदावन, उत्तर प्रदेश
15.श्रीराम मंदिरअयोध्या, उत्तर प्रदेश
16.सूर्य मंदिरकोणार्क, ओडिशा
17.श्री जगन्नाथ मंदिरपुरी, ओडिशा
18.लिंगराज मंदिरभुवनेश्वर, ओडिशा
19.मुक्तेश्वर मंदिरभुवनेश्वर, ओडिशा
20.कामाख्या देवी मंदिरगुवाहाटी, आसाम
21.महाबोधी मंदिरगया, बिहार
22.रणकपूर मंदिरपाली, राजस्थान
23.अजमेर दरगाहअजमेर, राजस्थान
24.सोमनाथ मंदिरसोमनाथ, गुजरात
25.द्वारकाधीश मंदिरद्वारका, गुजरात
26.नागेश्वर मंदिरद्वारका, गुजरात
27.सांची स्तूपसांची, मध्य प्रदेश
28.खजुराहो मंदिरखजुराहो, मध्य प्रदेश
29.महाकालेश्वर मंदिरउज्जैन, मध्य प्रदेश
30.ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिरखांडवा आणि ब्रह्मपुरी, मध्य प्रदेश
31.श्रीरंगनाथस्वामी मंदिरश्रीरंगम, तामिळनाडू
32.गोमटेश्वर मंदिरश्रवणबेलगोळ, कर्नाटक
33.विरुपाक्ष मंदिरहम्पी, कर्नाटक
34.चेन्नाकेशव मंदिरबेलूर, कर्नाटक
35.अन्नपूर्णेश्वरी मंदिरहोरानाडू, कर्नाटक
36.महाबळेश्वर मंदिरगोकर्ण, कर्नाटक
37.भूतनाथ मंदिरबदामी, कर्नाटक
38.मुरुडेश्वर मंदिरमुरुडेश्वर, कर्नाटक
39.आयहोळे दुर्ग मंदिरआयहोळे, कर्नाटक
40.श्रीकृष्ण मंदिरउडुपी, कर्नाटक
41.वीर नारायण मंदिरबेल्लारी, कर्नाटक
42.तिरुपती बालाजी मंदिरतिरुमला, आंध्र प्रदेश
43.मल्लिकार्जुन मंदिरश्रीशैलम, आंध्र प्रदेश
44.बृहदेश्वर मंदिरतंजावर, तामिळनाडू
45.मीनाक्षी मंदिरमदुराई, तामिळनाडू
46.रामनाथस्वामी मंदिररामेश्वरम, तामिळनाडू
47.कांचीपुरम मंदिरकांचीपुरम, तामिळनाडू
48.श्रीरंगनाथस्वामी मंदिरत्रिची, तामिळनाडू
49.अरुणाचलेश्वर मंदिरतिरुवन्नामलई, तामिळनाडू
50.कैलासनाथ मंदिरकांचीपुरम, तामिळनाडू
51.एकाम्बरेश्वर मंदिरकांचीपुरम, तामिळनाडू
52.सारंगपाणी मंदिरकुंभकोणम, तामिळनाडू
53.शोरे मंदिरमहाबलीपुरम, तामिळनाडू
54.मुरुगन मंदिरतिरुचेंदूर, तामिळनाडू
55.श्री पद्मनाभस्वामी मंदिरतिरुवनंतपुरम, केरळ
56.गुरुवायूर मंदिरगुरुवायूर, केरळ
57.पक्कुननारायण मंदिरथ्रिसूर, केरळ
58.पार्थसारथी मंदिरअरनमुला, केरळ
59.सबरीमाला मंदिरपथानामथिट्टा, केरळ
60.अट्टुकल भगवती मंदिरतिरुवनंतपुरम, केरळ
61.श्रीकृष्ण मंदिरगुरुवायूर, केरळ
62.तिरुनेल्ली मंदिरवायनाड, केरळ
63.वैकोम महादेव मंदिरकोट्टायम, केरळ
64.थिरुवल्ला मंदिरथिरुवल्ला, केरळ
65.पेरुवन्नारकर मंदिरकोल्लम, केरळ
66.श्री सम्मेद शिखरजी (पारसनाथ)झारखंड
67.श्री षट्रुंजयगुजरात
68.गिरनारगुजरात
69.देवगढउत्तर प्रदेश
70.पावापुरीबिहार
71.रणकपूरराजस्थान
72.दिलवाडा मंदिरराजस्थान
73.उदयगिरीमध्य प्रदेश
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra

महाराष्ट्रातील तीर्थस्थळे

अ. क्र.तीर्थस्थळाचे नावजिल्हा
1.श्री सिद्धिविनायक मंदिरमुंबई
2.महालक्ष्मी मंदिरमुंबई
3.चैत्यभूमी दादरमुंबई
4.माउंट मेरी चर्च (बांद्रा)मुंबई
5.मुंबादेवी मंदिरमुंबई
6.वाळकेश्वर मंदिरमलबार हिल, मुंबई
7.ग्लोबल विपश्यना पॅगोडागोराई, मुंबई
8.चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थकळंब, मुंबई
9.सेंट अँड्र्यू चर्चमुंबई
10.सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चसीप्झ औद्योगिक क्षेत्र, अंधेरी, मुंबई
11.सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चमरोल, मुंबई
12.गोदीजी पार्श्वनाथ मंदिरमुंबई
13.केनेसथ एलियाहू सिनेगॉगफोर्ट, मुंबई
14.तारा रमानी सिनेगॉगमस्जिद बंदर, मुंबई
15.मॅगेन डेव्हिड सिनेगॉगभायखळा, मुंबई
16.सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चठाणे
17.अग्यारी / अस्नगमंदिरठाणे
18.मयूरेश्वर मंदिरमोरगाव, पुणे
19.चिंतामणी मंदिरथेऊर, पुणे
20.गिरिजात्मज मंदिरलेण्याद्री, पुणे
21.महागणपती मंदिरराजणगाव, पुणे
22.खंडोबा मंदिरजेजुरी, पुणे
23.संत ज्ञानेश्वर समाधी मंदिरआळंदी, पुणे
24.भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरखेड तालुका, पुणे
25.संत तुकाराम महाराज समाधी मंदिरदेहू, पुणे
26.संत चोखामेळा समाधीपंढरपूर, सोलापूर
27.संत सरतामाळी समाधी मंदिरअरण, ता. माढा, सोलापूर
28.विठोबा मंदिरपंढरपूर, सोलापूर
29.औंध मंदिरसातारा
30.महालक्ष्मी मंदिरकोल्हापूर
31.जोतिबा मंदिरकोल्हापूर
32.जैन मंदिरकुंभोज, कोल्हापूर
33.रेणुका देवी मंदिरमाहूर, नांदेड
34.गुरु गोबिंदसिंग समाधी, हजूर साहिबनांदेड
35.खंडोबा मंदिरमालेगाव, नांदेड
36.श्री संत नामदेव महाराज दर्शनउंब्रज, ता. कंधार, नांदेड
37.तुळजा भवानी मंदिरतुळजापूर, धाराशिव
38.संत एकनाथ समाधीपैठण, छत्रपती संभाजीनगर
39.घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरवेरूळ, छत्रपती संभाजीनगर
40.जैन स्मारकेएलोरा लेणी, छत्रपती संभाजीनगर
41.गिरणेश्वर मंदिरओझर, नाशिक
42.संत निवृत्तीनाथ समाधीत्र्यंबकेश्वर, नाशिक
43.त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरत्र्यंबकेश्वर, नाशिक
44.मुक्तीधामनाशिक
45.सप्तशृंगी मंदिरवणी, नाशिक
46.काळाराम मंदिरनाशिक
47.जैन मंदिरमांगी-तुंगी, नाशिक
48.गजपंतनाशिक
49.संत साईबाबा मंदिरशिर्डी, अहमदनगर
50.श्री सिद्धिविनायक मंदिरश्रीकोट, अहमदनगर
51.वणी मंदिरवणी, चांदवड, अहमदनगर
52.श्री क्षेत्र भगवानगडपारडी, अहमदनगर
53.बल्लाळेश्वर मंदिरपाली, रायगड
54.संत गजानन महाराज मंदिरशेगाव, बुलढाणा
55.एकवीरा देवीकार्ला, पुणे
56.श्री दत्त मंदिरऔदुंबर, सांगली
57.केदारेश्वर मंदिरबीड
58.वैजनाथ मंदिरपरळी, बीड
59.पारसरत्नागिरी
60.गणपतीपुळेरत्नागिरी
61.मालेश्वर मंदिररत्नागिरी
62.महाकाली देवीचंद्रपूर
63.श्री काळेश्वरी उफळ काळुबाई मंदिरसातारा
64.अष्टधातुज (रामटेक)नागपूर
65.दीक्षाभूमीनागपूर
66.चिंतामणी (कळंब)यवतमाळ
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra

Leave a Comment