Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form Rejected : आज आपण ‘लाडकी बहिन योजना’ संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स आणि अर्ज रिजेक्ट होण्याच्या कारणांवर माहिती घेणार आहोत.
Ladki Bahin Yojana Form Rejected Reasons
1. आधार कार्डची समस्या (Aadhar Card)
अर्जदाराच्या आधार कार्डाची माहिती उपलब्ध नसेल तर अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. आधार कार्डाची वैधता आणि तपशील अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
2. अधिवास प्रमाणपत्र
अर्जदाराचे अधिवास प्रमाणपत्र जोडले नसेल तर अर्ज रिजेक्ट होईल. या प्रमाणपत्राद्वारे अर्जदाराचा स्थायिक पत्ता सिद्ध केला जातो.
3. उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र जोडले नसेल तर अर्ज रिजेक्ट होईल. या प्रमाणपत्राद्वारे अर्जदाराच्या आर्थिक स्थितीची माहिती मिळवली जाते.
4. रेशन कार्ड (Rashan Card)
अर्जदाराच्या रेशन कार्डची माहिती जोडली नसेल तरी फॉर्म रिजेक्ट होईल. रेशन कार्ड अर्जदाराच्या कुटुंबाच्या राशन वितरणाच्या अधिकाराची तपासणी करते.
5. हमी पत्र
हमी पत्र दिले नसेल किंवा त्यात त्रुटी असतील तर अर्ज रिजेक्ट होईल. या पत्राद्वारे अर्जदाराने योग्य माहिती दिली आहे याची खात्री केली जाते.
6. आयकरदात्या सदस्याचे प्रमाणपत्र
कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास, तर अर्ज रिजेक्ट होईल
Ladki bahin Yojana अर्ज रिजेक्ट होण्याचे प्रकार
1. पार्शियल रिजेक्शन
काही त्रुटी असलेल्या फॉर्ममध्ये अर्जदाराला फॉर्म पुन्हा सबमिट करण्याची संधी मिळते. यामध्ये त्रुटी दुरुस्त करून अर्ज पुन्हा सादर करावा लागतो.
2. फुल्ली रिजेक्शन
गंभीर त्रुटीमुळे फॉर्म पूर्णपणे रिजेक्ट होतो आणि अर्जदाराला फॉर्म पुन्हा भरावा लागतो. यामध्ये अर्जाच्या सर्व माहितीच्या पुनरावलोकनाची आवश्यकता असते.
Ladki Bahin Yojana Form Pending अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया
1. नारीशक्ती दूत अँप (Nari Shakti Doot APP)
Mukhymantri Majhi Ladki Bahin Application Status: अर्जदारांनी अर्जाच्या स्थितीची माहिती नारीशक्ती दूत अँपच्या माध्यमातून पाहता येईल. अर्जाच्या स्थितीचे स्टेटस ‘Approved’, ‘Pending for Approval’, ‘Edit and Resubmit’, किंवा ‘Reject’ असू शकते.
- Approved
जर अर्जाचा स्टेटस ‘Approved’ असेल, तर अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे आणि पैसे खात्यात जमा होणार आहेत. - Pending for Approval
जर स्टेटस ‘Pending for Approval’ असेल, तर अर्ज अद्याप तपासला गेलेला नाही. अर्जाच्या प्रक्रियेसाठी थोडा अधिक वेळ लागेल. - Edit and Resubmit
‘Edit and Resubmit’ स्टेटस दर्शवत असल्यास, अर्जातील त्रुटी दुरुस्त करून पुन्हा सबमिट करावे लागेल. - Reject
जर अर्जाचा स्टेटस ‘Reject’ असेल, तर अर्ज रिजेक्ट झाल्याचे दर्शवते. रिजेक्शनची कारणे तपासून आवश्यक सुधारणा करावी लागेल.
हे हि वाचा: Mukhyamantri Annapurna Yojana: आता मुख्यमंत्री लाडकी बहिणीला गॅस सिलेंडर पण मोफत
Ladki bahin Yojana लाडकी बहिन योजनेचा महत्वाचा दिनांक
राज्य सरकार 19 ऑगस्टला, म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी, जुलै आणि ऑगस्टच्या एकत्रित ₹3000 जमा करणार आहे. अर्ज पात्र ठरवणे आवश्यक आहे, अन्यथा पैसे खात्यात जमा होणार नाहीत.
अर्जाची स्थिती तपासून, योग्य त्या दुरुस्त्या करून, फॉर्म पुन्हा सबमिट करा. तसेच, आपल्या अर्जाची स्थिती अद्ययावत ठेवण्यासाठी नारीशक्ती दूत अँपचा वापर करा.