मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 7 मोठे बदल: महाराष्ट्र सरकारची नवी घोषणा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महाराष्ट्र सरकारने दोन 7 महत्वाचे बदल केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या बदलांची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीच्या अटी आणि शर्तींमुळे सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे, मुख्यमंत्री शिंदे यांनी योजनेतील नियम शिथिल केले आहेत. या योजनेची नोंदणी 1 जुलैपासून सुरु झाली असून, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात महिलांनी मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे.

मुख्य बदल

अर्जाची मुदत वाढवली

या योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 ठेवण्यात आली होती. आता ही मुदत दोन महिन्यांनी वाढवून 31 ऑगस्ट 2024 करण्यात आली आहे. अर्ज केलेल्या महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत.

आधिवास प्रमाणपत्रातील बदल

आधी योजनेत लाभ घेण्यासाठी आधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते. आता, जर लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मान्य केले जाईल.

शेतीची अट रद्द

योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.

वयोगटात बदल

लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता, तो आता 21 ते 65 वर्ष करण्यात आला आहे.

विवाहित महिलांसाठी अटींचे शिथिलीकरण

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास, त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मान्य केले जाईल.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 उत्पन्न प्रमाणपत्राची अट

2.5 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक होते. आता पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड उपलब्ध असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही.

अविवाहित महिलांसाठी लाभ

कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ मिळेल.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024

अर्ज कसा करायचा?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 योजनेच्या लाभासाठी महिलांना पोर्टल किंवा मोबाईल अॅपद्वारे अर्ज करता येईल. तसेच, सेतू सुविधा केंद्राद्वारेही अर्ज सादर करता येईल. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील जन्मदाखला
  • वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असल्याचे प्रमाणपत्र
  • बँक खात्याचे पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशनकार्ड
  • अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

महिला योजनेच्या लाभासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांसह अर्ज करू शकतात. योजनेत केलेले बदल महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी उपयुक्त ठरतील.

Leave a Comment