मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र नाही? मग असा भरा अर्ज

Mazi Ladki Bahin Yojana: उत्पन्नाचा दाखला नसेल तर?

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत, परंतु योजनेचा लाभ कसा घ्यावा आणि पात्रता काय असणार याविषयी संभ्रम आहे.

योजनेत केलेले बदल

महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण Mazi ladki bahin yojana marathi योजनेच्या अटी आणि नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तरीही पात्र महिलांना योजनेचा लाभ घेता येईल. अर्ज भरणे आणि कागदपत्रांची पूर्तता करणे अधिक सोपे झाले आहे.

अर्ज करण्याची मुदत वाढवली

या योजनेच्या अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. योजनेत अर्ज केल्यानंतर, पात्र महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.

रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर

Majhi Ladki Bahin Yojana documents in marathi रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर अर्जदार महिलांना खालील पर्याय दिले आहेत:

  • 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • जन्म दाखला

या चारपैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल.

हे ही वाचा>> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही?

उत्पन्नाचा दाखला नसेल तर

अडीच लाखांच्या उत्पन्नाची अट आहे. परंतु, उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.

Mazi ladki bahin yojana योजनेच्या इतर अटी

योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. तसेच, लाभार्थी महिलांची वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष होती, ती 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आली आहे.

इतर राज्यातील महिलांसाठी

इतर राज्यातील महिलांनी महाराष्ट्राच्या रहिवाशी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक असेल.

अविवाहित महिलांसाठी

या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा लाभ देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नारी शक्ती अ‍ॅप डाउनलोड

लाभार्थी महिलांना अधिक माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र नारी शक्ती अ‍ॅप डाउनलोड करता येईल.

महाराष्ट्र नारी शक्ती अ‍ॅप डाउनलोड करा NariShakti App Download

हे ही वाचा>> मोबाईलवरून लाडकी बहिण योजनेचा फॉर्म कसा भरावा: जाणून घ्या Ladki Bahin Yojana Nari Shakti App

Leave a Comment