Majhi ladki bahin yojana hamipatra pdf marathi
महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण’ ही नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक मदत व सुरक्षा प्रदान करणे आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना हमीपत्र भरावे लागणार आहे. हे हमीपत्र कसे भरावे याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
हमीपत्रात भरावयाची माहिती
महिलांचे संपूर्ण नाव आणि वैवाहिक स्थिती
महिलेचे लग्नानंतर आणि लग्नापूर्वीचे नाव, जन्म तारीख, व स्थायी पत्ता भरावा लागणार आहे. याशिवाय, वैवाहिक स्थिती ही सद्यःस्थितीप्रमाणे नमूद करावी लागणार आहे, जसे की विवाहित, घटस्फोटीत, विधवा, परित्यक्ता, किंवा निराधार.
मोबाईल आणि आधार क्रमांक
महिलेचा वैध मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक भरावा लागेल. यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला जातो का याची पडताळणी होईल.
आर्थिक स्थिती
महिलेच्या आर्थिक स्थितीबद्दल तपशील विचारला जाईल. यात वार्षिक उत्पन्न, कुटुंबातील सदस्यांची आर्थिक परिस्थिती, आणि महिला कोणत्या आर्थिक योजनांचा लाभ घेतात का हे विचारले जाईल.
बँक खाते तपशील
महिलेच्या बँक खात्याचा तपशील विचारला जाईल. यामध्ये बँकेचे नाव, खाते धारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, आणि IFSC कोड भरावा लागणार आहे. याशिवाय, आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का हेही विचारले जाईल.
महिला सक्षमीकरण वर्ग
महिलेच्या कार्यक्षेत्रानुसार, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वाडज अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला इत्यादी वर्गात आपली निवड करावी लागेल.
आवश्यक कागदपत्रे
हमीपत्रासोबत जोडायची कागदपत्रे
Ladki Bahin Yojana Hamipatra हमीपत्रासोबत काही कागदपत्रांच्या प्रती जोडणे आवश्यक आहे. यात आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, आणि महिलांचा फोटो यांचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहेत.
हमीपत्र
महिलेने स्वतःची आर्थिक स्थिती आणि कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल हमी द्यावी लागेल. यात वार्षिक उत्पन्न, आयकरदाता, सरकारी कर्मचारी, इतर आर्थिक योजनांचा लाभ, शेतजमीन, आणि चारचाकी वाहन याबद्दल माहिती भरावी लागेल.
Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra marathi download
अर्ज प्रक्रियेची पावती
हमीपत्र ऑनलाईन सादर केल्यानंतर, अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्याची पावती प्राप्त होईल. तसेच SMS किंवा व्हॉट्सअॅपद्वारेही पावती पाठवण्यात येईल.
महाराष्ट्र सरकारच्या ‘नारी शक्ती’ ॲपद्वारे ही योजना सहजगत्या उपलब्ध आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण’ योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात महत्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास आहे.
नारी शक्ती ॲप डाउनलोड करा nari shakti doot login
majhi ladki bahin yojana maharashtra online apply 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र नाही? मग असा भरा अर्ज