Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana: महिलांसाठी नवा जीआर आणि महत्त्वपूर्ण बदल

Mukhyamantri majhi Ladki Bahin Yojana: मुंबई : राज्य सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”(Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मोठे बदल केले आहेत. या निर्णयामुळे हजारो महिलांना फायदा होणार आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

योजनेची विस्तारित व्याप्ती Mukhyamantri majhi Ladki Bahin Yojana

राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत सरकारने 11 जुलै 2024 रोजी निर्णय घेतला. या निर्णयानुसार, योजनेच्या अंमलबजावणीसाठी “वाडणस्तरीय समिती” (Ward Level Committee) गठीत करण्यात आली आहे. या समिती विविध विभागांचे सचिव अध्यक्षपद भूषवतील आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करतील.

तसेच, प्रशासकीय आणि तांत्रिक अडीअडचणी सोडवण्यासाठी “Empowered Committee” स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीच्या अध्यक्षतेखाली विविध सरकारी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल, जे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक निर्णय घेतील.

कुटुंबाची व्याख्या आणि अर्ज प्रक्रियेत सुधारणा

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) साठी कुटुंबाची व्याख्या आणि अर्ज प्रक्रियेत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत:

  • पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले/मुली: या कुटुंबातील सदस्यांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र ठरवले जाईल.
  • नवविवाहित महिलांच्या बाबतीत: वधूचे नाव रेशनकार्डवर लावणे शक्य नसल्यास, विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Certificate) ग्राह्य धरण्यात येईल.
  • परराज्यात जन्मलेल्या महिलांसाठी: परराज्यात जन्मलेल्या आणि सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केल्यास त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा निवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.

अर्ज प्रक्रियेत सुधारणा: अर्ज प्रक्रियेतील सुधारणा यामध्ये योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. त्यामुळे लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही.ढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल, त्यामुळे लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही.

लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया Mukhyamantri majhi Ladki Bahin Yojana Application

Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana महिलांनी अर्ज करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, त्यासाठी सरकारने विविध पायऱ्या सोप्या केल्या आहेत:

  • अंगणवाडी सेविका, आशा सेविका, NULM समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी प्राधिकृत केले आहे.
  • ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी होऊ शकते (Online or Offline).
  • लाभार्थी महिलांचे अर्ज ऑनलाईन अपलोड केल्यानंतर अंगणवाडी सेविका त्यांना रु.५०/- प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.

लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana List

ग्रामपातळीवर ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, आणि अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची “ग्रामस्तरीय समिती”(Village Level Committee) गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत अंवतम लाभार्थ्यांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी वाचन करण्यात येणार आहे. तसेच, गाव चावडीवर वाचन करून ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे यादी प्रसिद्ध करण्यात येईल. यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात येईल आणि नोंदणीत नक्कल टाळण्यात येईल.

Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana

Mazi Ladki Bahin Yojana: बँक माहिती चुकली की 1500 रुपये गेले?

तालुकास्तरीय समिती

महानगरपालिका क्षेत्रातील अंमलबजावणीसाठी “वार्डस्तरीय समिती”((Ward Level Committee)) गठीत करण्यात आली आहे. ही समिती आता फक्त “अ+”, “अ” व “ब” वगण महानगरपालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात लागू होईल. तालुकास्तरीय समितीमाफर्त पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांच्या यादीची देखरेख आणि नियंत्रण करण्यात येईल.

महिलांना दिलासा: ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज

Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana महिलांना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे (Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana Last Date). सरकारतर्फे महिलांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये मिळणार आहेत. विरोधकांनी या योजनेला फक्त आगामी निवडणुकांसाठी असलेली योजना असे म्हटले होते, पण राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात स्पष्ट केले की, ही योजना निवडणुकीनंतरही चालू राहील.

महिलांसाठी अतिरिक्त मदतीची योजना Ladki Bahin Yojana Helpline

Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana योजनेच्या कार्यान्वयनाच्या प्रक्रियेत, महिलांसाठी अतिरिक्त मदतीचा विचार करण्यात आलेला आहे. बँक खात्यांची माहिती, रेशनकार्डवरील नावाची तपासणी आणि उत्पन्न प्रमाणपत्र याबाबतच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी विशेष मार्गदर्शन व सहाय्य प्रदान केले जाईल. या सुविधा महिलांना योजनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सहाय्यक ठरतील.

Majhi Ladki Bahin Yojana: पहिला हप्ता रक्षाबंधनाला खात्यात जमा होणार?

Leave a Comment