मुंबई, २९ जुलै २०२४: राज्यातील कापूस सोयाबीन (cotton soybean) उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. २०२३ च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकांना झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५,००० रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ही घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
Cotton Soybean अर्थसहाय्याची घोषणा
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार, २०२३ च्या खरीप हंगामात (cotton soybean) कापूस सोयाबीन पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढाओढ आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी ₹५,००० रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणाला मिळणार लाभ?
हे अर्थसहाय्य मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी २०२३ च्या खरीप हंगामात कापूस सोयाबीन ची लागवड केलेली असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांनी ई-पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर आपल्या पिकांची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
किती मिळणार मदत?
०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना एक सरसकट १,००० रुपये देण्यात येतील. तर, ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५,००० रुपये याप्रमाणे हेक्टरी जास्तीत जास्त २ हेक्टर पर्यंत अर्थसहाय्य मिळेल.
कधी आणि कसे मिळणार पैसे?
राज्य सरकारने या योजनेसाठी ₹४१९४.६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात थेट जमा केले जातील.
महत्वाचे मुद्दे
- ही योजना केवळ २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन (cotton soybean) उत्पादक शेतकऱ्यांसाठीच आहे.
- अर्थसहाय्य मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
- ई-पीक पाहणी ॲप/पोर्टल वर नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
वाचा शासन निर्णय
या योजनेमुळे राज्यातील लाखो कापूस सोयाबीन (cotton soybean) उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.