Lek Ladki Yojana Form PDF Download
Lek Ladki Yojana: मुंबई, २२ जुलै २०२४: राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने “लेक लाडकी योजना” ही महत्वाकांक्षी योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरू केली आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवणे, बालविवाह रोखणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
“माझी कन्या भाग्यश्री” योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही नवी योजना आणण्यात आली आहे. “लेक लाडकी योजना” अंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य देण्यात येते.
लेक लाडकी योजनेची वैशिष्ट्ये:
- योजनेचा लाभ कोणासाठी?: ही योजना १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींसाठी आहे.
- योजनेचे स्वरूप: मुलीच्या जन्मानंतर ५ हजार, इयत्ता पहिलीत ६ हजार, सहावीत ७ हजार, अकरावीत ८ हजार तर वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये असे एकूण १,०१,००० रुपये दिले जातात.
- योजनेचा उद्देश: मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करणे.
लेक लाडकी योजना अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे Lek Ladki Yojana Documents:
- लाभाथीचा जन्माचा दाखला Lek Ladki Yojana Documents Birth Certificate
- कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसावे)
- लाभाथीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहिल)
- पालकांचे आधार कार्ड Aadhar Card
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड)
- मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
- संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafide)
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आवश्यक)
- अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, (अविवाहित असल्याबाबत लाभाथीचे स्वतः घोषणापत्र).
- Lek Ladki Yojana Documents List
लेक लाडकी योजना अर्ज कसा करावा? Lek Ladki Yojana Form PDF
- मुलीच्या जन्मानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी करावी.
- त्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे “Lek Ladki Yojana Form PDF“ मिळेल. हा फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.
- “Lek Ladki Yojana Documents” ची पडताळणी झाल्यानंतर लाभार्थ्यांना योजनेचा लाभ टप्प्याटप्प्याने मिळत जाईल.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, कृपया Lek Ladki Yojana Form PDF Download लेक लाडकी योजना फॉर्म PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया Lek Ladki Yojana Form PDF Download
- नोंदणी: मुलीच्या जन्मानंतर संबंधित स्थानीक स्वराज्य संस्थेत नोंदणी करावी.
- अर्ज सादर: आवश्यक कागदपत्रांसह अर्ज अंगणवाडी सेविकेकडे (Lek Ladki Yojana Form PDF) सादर करावा.
- प्रवेश आणि तपासणी: अर्जाची तपासणी करून प्रत्येक महिन्याला लाभार्थी यादीची नोंदणी करावी.
Namo Shetkari 4th Installment Date: नमो शेतकरी चौथा हप्ता तारीख आली
सुकाणू समिती व कार्यकारी समिती
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर सुकाणू समिती गठीत करण्यात आली आहे. कार्यकारी समितीची बैठक सहा महिन्यांतून एकदा आयोहजित केली जाईल. Lek Ladki Yojana Form PDF Download
लेक लाडकी योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून ती मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा आहे.