Ladki Bahin Yojana Status: राज्य सरकारने महिलांना सन्मान निधी म्हणून 3000 रुपये दिले असून, हे पैसे 14 ऑगस्टपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. आतापर्यंत तब्बल 96 लाख 35 हजार महिलांच्या खात्यात हे पैसे यशस्वीरित्या हस्तांतरित झाले आहेत. 19 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
कोणत्या महिलांना लाभ?
Ladki Bahin Yojana Status अंतर्गत 31 जुलैपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा केले जातील. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांनी अर्ज केले असल्यास, त्यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतरच त्यांना पैसे मिळणार आहेत. ज्या महिलांचे अर्ज अजूनही प्रक्रियेत आहेत, त्यांना थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागेल.
Ladki Bahin Yojana Check Payment Status: लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठे जमा होतील?
लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया
14 ऑगस्ट रोजी 32 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले, तर 15 ऑगस्ट रोजी 48 लाख महिलांच्या खात्यात हा निधी हस्तांतरित करण्यात आला. Ladki Bahin Yojana Status अंतर्गत उर्वरित महिलांच्या खात्यातही 19 ऑगस्टपर्यंत पैसे जमा होतील, अशी माहिती मंत्री तटकरे यांनी दिली. या प्रक्रियेला गती देण्यासाठी महिला व बालविकास विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.
अर्ज स्थिती आणि तातडीचे उपाय
ज्या महिलांनी Ladki Bahin Yojana Status साठी अर्ज केले आहेत, त्यांनी त्यांच्या अर्जाची स्थिती तपासणे आवश्यक आहे. जर अर्ज ‘Submitted’ दाखवत असेल आणि अद्याप मंजूर झालेला नसेल, तर अर्ज मंजूर होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. अर्जातील कोणत्याही चुकांची दुरुस्ती तातडीने करावी आणि पुन्हा सबमिट करावा.
Ladki Bahin Yojana Rs 3000: ‘लाडकी बहिण योजना’ चा लाभ मिळण्यास सुरुवात; बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा
बँकांमध्ये गर्दी आणि उपाय
योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये महिलांची तुफान गर्दी होत आहे. अनेक महिलांनी त्यांच्या बँक खात्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे पैसे काढण्यासाठी त्यांना अधिक प्रतीक्षा करावी लागते. तुमचं DBT स्टेटस चेक करा Ladki Bahin Yojana अंतर्गत पैसे खात्यात जमा झाल्यानंतरच ते काढण्यासाठी बँकेकडे जाणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, Ladki Bahin Yojana साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही. त्यामुळे महिलांना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अजूनही संधी उपलब्ध आहे.
Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check: 3000 रुपये फक्त ‘या’ महिलांच्या खात्यात
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana चा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी तात्काळ अर्ज करावा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत.