Ladki Bahin Yojana Rs 3000: ‘लाडकी बहिण योजना’ चा लाभ मिळण्यास सुरुवात; बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा

Ladki Bahin Yojana Rs 3000 Credited- मुंबई: राज्यातील लाखो बहिणींच्या प्रतिक्षेनंतर, बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ अंतर्गत आर्थिक सहाय्याचे वितरण सुरू झाले आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींना ‘लाडकी बहिण योजना’ चा पहिला हप्ता मिळण्यास सुरुवात झाली असून, अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात 3000 रुपये जमा (Ladki Bahin Yojana Rs 3000) झाल्याची माहिती समोर येत आहे.

‘लाडकी बहिण योजना’ : पहिला हप्ता जमा

भाजप आमदार राम सातपुते यांनी याबाबत माहिती दिली असून, ‘लाडकी बहिण योजना’ Ladki Bahin Yojana Rs 3000 च्या माध्यमातून महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे स्क्रीनशॉट देखील त्यांनी शेअर केले आहेत. राज्य सरकारने रक्षाबंधनापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा मिळून 3000 रुपयांचा लाभार्थ्यांच्या (Ladki Bahin Yojana Rs 3000) खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, 31 जुलै पूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींना ‘लाडकी बहिण योजना’ च्या पहिल्या हप्त्याची रक्कम (Ladki Bahin Yojana Rs 3000) मिळाली आहे.

१ कोटी ४० लाख महिलांची नोंदणी पूर्ण

‘लाडकी बहिण योजना’ सुरू होऊन एक महिनाही झालेला नाही आणि आतापर्यंत राज्यातील १ कोटी ४० लाख महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. ही योजना सुरू करण्यासाठी शासन गेल्या दहा महिन्यांपासून काम करत होते. या योजनेसाठी 33 हजार कोटी इतक्या रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हे हि वाचा: Mahadbt Farmer Favarni Pump Yojana: बॅटरी फवारणी पंपासाठी 100% अनुदान अर्ज मुदत 14 ऑगस्ट 2024 पर्यंत

‘लाडकी बहिण योजना’ : लाभार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट

ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला नाही, त्यांना सप्टेंबरमध्ये एकत्रित तीन महिन्यांचा म्हणजेच 4500 रुपयांचा लाभ मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ‘लाडकी बहिण योजना’ च्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दिलासा मिळणार असून, या योजनेला महिलांनी देखील चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

Ladki Bahin Yojana Rs 3000 Credited

Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check: 3000 रुपये फक्त ‘या’ महिलांच्या खात्यात

Leave a Comment