Ladki Bahin Yojana Loan: आता महिलांना मिळणार 1 लाख कर्ज शून्य व्याजदराने!

By Jay
On: Saturday, June 21, 2025 11:12 AM
Ladki Bahin Yojana Loan

Ladki Bahin Yojana Loan: मुंबईत राहणाऱ्या लाखो महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana Loan अंतर्गत आता महिलांना थेट 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, तेही शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे. हा निर्णय मुंबई बँक आणि राज्य सरकारच्या चार महामंडळांच्या सहकार्याने घेण्यात आला असून, महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी ही योजना मोठं पाऊल ठरणार आहे.

Ladki Bahin Yojana Loan म्हणजे काय?

मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana Loan ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्यामुळे महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळते. या योजनेतून आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यास सुरुवात केली आहे.

आता मिळणार शून्य टक्के व्याजदराने कर्ज

मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, Ladki Bahin Yojana Loan अंतर्गत आता महिलांना पूर्वी 9% दराने मिळणारे कर्ज, थेट 0% व्याज दराने मिळेल. यामध्ये 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार असून, विशेषतः 5 ते 10 महिलांची गट तयार करून संयुक्त व्यवसाय करण्यावर भर दिला जाणार आहे.

कोणत्या महामंडळांमार्फत होणार लाभ?

या योजनेतील शून्य व्याजदराच्या लाभासाठी चार प्रमुख महामंडळे सक्रिय भूमिका बजावत आहेत:

◾ अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ

◾ भटक्या विमुक्त जमातीसाठी महामंडळ

◾ ओबीसी (मागासवर्गीय) महामंडळ

◾ पर्यटन महामंडळाची ‘आई योजना’

या सर्व योजनांमध्ये 9% ते 12% पर्यंत व्याज परतावा लाभार्थी महिलांना मिळतो. त्यामुळे, जर लाभार्थी महिला या योजनांमध्ये समाविष्ट असतील, तर त्यांना Ladki Bahin Yojana Loan अंतर्गत पूर्ण शून्य व्याजाने कर्ज मिळू शकते.

कर्ज कसं मिळेल? – अर्ज व अटी

  • लाभ घेण्यासाठी महिलांनी मुंबई बँकेमध्ये अर्ज करावा लागेल.
  • व्यवसायाच्या तपासणी व पडताळणीनंतर कर्ज मंजूर केले जाईल.
  • योजनेच्या अटींमध्ये महिलांना एकत्र येऊन व्यवसाय सुरू करण्याचा पर्याय दिला जात आहे.
  • महामंडळांकडून व्याज परतावा मिळवण्यासाठी मुंबई बँक स्वतः पुढाकार घेणार आहे.

हे हि वाचा: Gharkul Yojana Online Apply Awaas Plus: Awaas+ ॲपवर अर्ज कसा कराल? सविस्तर माहिती

किती महिलांना होणार फायदा?

मुंबई शहरात सध्या जवळपास 12 ते 13 लाख महिला Ladki Bahin Yojana Loan चा लाभ घेत आहेत. त्यातील 1 लाख महिलांनी मुंबई बँकेचे सदस्यत्व घेतले असून, या बँकेमार्फत या सर्वांना शून्य व्याजाचे कर्ज पुरवले जाणार आहे. हे स्वयंपूर्ण विकासासाठी मोठं पाऊल मानलं जात आहे.

Ladki Bahin Yojana Loan योजना कधीपासून सुरू?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संबंधित खात्याचे सचिव आणि चारही महामंडळांचे संचालक यांच्या उपस्थितीत हा निर्णय अंतिम करण्यात आला आहे. आदेश देण्यात आले असून, लवकरच Ladki Bahin Yojana Loan अंतर्गत शून्य टक्के व्याजदराने कर्ज वाटप सुरू होणार आहे.

हे हि वाचा:Systematic Withdrawal Plan-SWP: SIP पेक्षा दमदार योजना, पैसे गुंतवा दर महिन्याला कमवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment