Ladki Bahin Yojana: महिलांना पुढील हप्त्यासाठी डिसेंबरपर्यंत थांबावे लागणार

Ladki Bahin Yojana News: महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सध्या तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या दरम्यान मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजना तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या योजनेचे निधी वितरण देखील पुढे ढकलण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेला आचारसंहितेमुळे स्थगिती

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana अंतर्गत महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र, सध्या आचारसंहिता लागू झाल्यामुळे या योजनेचे पुढील हप्ते डिसेंबरपर्यंत जमा होणार नाहीत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये आतापर्यंत दीड कोटी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत, परंतु पुढील हप्त्यासाठी महिलांना निवडणुका होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून अंमलात आली आहे आणि योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये त्यांच्या आधारशी लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत आणि पाठबळ देणे आहे.

हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Next Installment Date: दुसऱ्या टप्प्यात 50 लाख महिलांना लाभ, तारीख पहा

योजनेचा लाभ आतापर्यंत

जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या तीन महिन्यांसाठीचा लाभ पात्र भगिनींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तसेच, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचा लाभही 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान महाराष्ट्रातील 2 कोटी 34 लाख महिलांना दिला गेला आहे.

Ladki Bahin Yojana Installment date december

डिसेंबर महिन्याचा लाभ

सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील नियमानुसार डिसेंबरमध्ये दिला जाईल. योजनेबद्दल काही अफवा पसरवण्यात आल्या आहेत, परंतु महिलांनी अशा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. शासनाच्या ताज्या घोषणांनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नियमितपणे सुरूच राहील.

अदिती एस. तटकरे, राज्यमंत्री

हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Form Status Pending: तुमचा पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडिंग? मग हे वाचा

आधार लिंक नसलेल्या महिलांचे संकट

लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana अंतर्गत 42 लाख महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही. त्यामुळे त्यांच्या अर्ज मंजूर होऊनदेखील, त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. एकदा आधार आणि बँक खाते लिंक झाल्यानंतर, पात्र महिलांना लाभ दिला जाईल.

लाडकी बहीण योजनेचे पुढील पाऊल

लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर होती, त्यामुळे सध्या नवीन अर्ज करता येणार नाहीत. आचारसंहिता लागू झाल्यामुळे योजनेचे निधी वितरण थांबले आहे आणि पुढील हप्ते डिसेंबर महिन्यापर्यंत जमा होणार नाहीत. महिलांना आता या योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागेल.

Ladki Bahin Yojana

हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Check Payment Status: लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठे जमा होतील?

Leave a Comment