मुंबई: मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिन’ Ladki bahin yojana First Installment योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2024 रोजी महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती शासन दरबारी मिळाली आहे. यावर्षी रक्षाबंधनाच्या पर्वणीसाठी, महिलांना 3000 रुपये थेट त्यांच्या खात्यात मिळणार आहेत.
लाडकी बहिन योजनेचा पहिला हप्ता
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिन’ योजनेसाठी 1 कोटींहून अधिक अर्ज शासनाकडे प्राप्त झाले आहेत. महिलांच्या अर्जांची प्रक्रिया सुरू असून, योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. 17 ऑगस्ट रोजी सरकारकडून या योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये वितरीत केला जाणार आहे. हा हप्ता रक्षाबंधनाच्या पर्वणीपूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
कार्यक्रमाची माहिती
17 ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. या दिवशी दोन ते अडीच कोटी महिलांना हप्ता (Ladki bahin yojana First Installment) देण्याचा सरकारचा विचार आहे. या निर्णयामुळे लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उच्च न्यायालयाचा निर्णय
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिन’ Ladki bahin yojana योजनेविरोधात दाखल करण्यात आलेले आव्हान माननीय उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. त्यामुळे योजनेची विश्वासार्हता आणि कार्यक्षमता सिद्ध झाली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी विविध उपाययोजना केली जात आहेत.
अर्ज प्रक्रिया आणि आकडेवारी
ताज्या आकडेवारीनुसार, राज्यभरात 1 कोटी 40 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 कोटी अर्जांची (Ladki bahin yojana First Installment) छानणी पूर्ण झाली आहे. काही अर्जांमध्ये त्रुटी दुरुस्त केल्यावर त्यांना मंजुरी दिली जाईल. तसेच, नामंजूर (Approve/Reject/Pending) अर्जांसाठी पुनः अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाईल.
हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Yadi :अर्जदार महिलांना कुठे पाहता येईल पात्रता यादी?
Ladki bahin yojana Applications
‘माझी लाडकी बहिन’ योजनेसाठी अर्ज शासनाच्या पोर्टल, नारीशक्तीदूत मोबाईल ॲप किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत भरण्यात येऊ शकतात.
अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट भेट द्या.