Ladki Bahin Yojana Check Payment Status: महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे, पण अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, याबाबत संभ्रम आहे. ही समस्या आधारकार्डचा वापर करून दूर करता येते. तुम्ही तुमच्या आधारकार्डवरून कोणत्या बँकेत पैसे जमा होतील हे तपासू शकता.
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या खात्यात जमा होतील
लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana Check Payment Status)पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. DBT प्रणाली एकाचवेळी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यास मदत करते आणि यासाठी आधार कार्ड क्रमांक वापरला जातो. तुमचे बँक डिटेल्स तपासले जाणार नाहीत. त्यामुळे तुमच्या ज्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे, त्या खात्यात पैसे जमा होतील.
आधारशी लिंक असलेले बँक अकाऊंट कसे तपासायचे?
- सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
- तुमचा १२ अंकी आधार कार्ड क्रमांक टाकून लॉग इन करा.
- आधार क्रमांक भरल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी प्राप्त होईल..
- आलेला ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये भरल्यानंतर तुम्हाला आधारशी संबंधित अनेक पर्याय दिसतील.
- नवीन पेजवरील “Bank Seeding Status” या पर्यायावर क्लिक करा.
- यात तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक आणि आधारशी लिंक बँकेचे नाव दिसेल. त्याचबरोबर हे खाते सक्रीय आहे की नाही, हे सुद्धा समजेल. तुम्हाला तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे कळेल.
तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्यास काय करावे?
जर तुम्हाला वरील प्रोसेसवरून तुमचे बँक अकाऊंट कळालं असेल तर त्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये जमा झाले आहेत. जर अजूनही पैसे जमा झाले नसतील, तर तुमचा अर्ज अजूनही मंजूर झालेला नसेल किंवा त्याची तपासणी चालू असू शकते.
लाडकी बहीण योजनेचा लाभ Majhi Ladki Bahin Yojana
- महाराष्ट्र शासनाने १ जुलै २०२४ रोजी “माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली आहे.
- या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळेल.
- ही रक्कम DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- आता लाभार्थी महिलांना आगामी रक्षाबंधनाला प्रत्येकी ३००० रुपयांचे दोन हप्ते मिळतील.
- महिला घरी बसून या मिळणाऱ्या पैशांचा नेमका स्टेट्स काय हे त्यांच्या मोबाइल फोनवरून ऑनलाइन तपासू शकतात.
- या रकमेचा वापर करून महिला त्यांच्या विविध गरजा पूर्ण करू शकतात तसेच शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करू शकतात.
- या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारून त्या स्वावलंबी होतील.
- माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महाराष्ट्र शासनाने महिलांना सशक्त आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी प्रदान केली आहे. या योजनेमुळे फक्त आर्थिक मदतच मिळत नाही, तर राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे सामर्थ्यही प्राप्त होते.
लाडकी बहीण योजनेचे पेमेंट स्टेट्स कसे तपासायचे (Ladki Bahin Yojana Check Payment Status)?
- पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टमच्या वेबसाइटला भेट द्या.
- वेबसाइटचे होम पेज उघडल्यानंतर तुम्हाला “Payment Status” सेक्शनमध्ये जावे लागेल.
- या सेक्शनमध्ये, तुम्हाला “DBT Status Tracker” च्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- नवीन पेज उघडल्यावर, तुमची “Category”, “DBT Status”, आणि “बँकेचे नाव” टाकावे लागतील.
- आता तुम्हाला तीन पर्यायांपैकी एकामध्ये माहिती प्रविष्ट करावी लागेल:
- Application ID
- Beneficiary Code
- Account Number
- दिलेला कॅप्चा कोड एंटर करा आणि “Search” वर क्लिक करा.
- आता तुमचे “Mazi Ladki Bahin Yojana DBT Status” तुमच्या समोर उघडेल, जिथे तुम्ही तुमच्या पेमेंटचे स्टेट्स पाहू शकता.
- या प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमची “माझी लाडकी बहीण योजनेचे” पेमेंट स्टेट्स ऑनलाइन तपासता येईल.
Ladki Bahin Yojana Check Payment Status
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक लाभ हस्तांतरणाच्या प्रक्रियेला कालपासून प्रारंभ झाला आहे. या योजनेच्या अंतर्गत ३२ लाख महिलांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लाभ वितरित करण्यात आला, तर आज स्वातंत्र्यदिनी पहाटे ४ वाजता ४८ लाख महिलांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे.
महिला व बालविकास विभागाची सक्रियता
योजना कार्यान्वयनात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून महिला व बालविकास विभाग २४ तास कार्यरत आहे. या प्रक्रियेवर मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत एकूण ८० लाख महिलांना लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.
हे हि वाचा: Mahadbt Farmer Favarni Pump Yojana: बॅटरी फवारणी पंपासाठी 100% अनुदान अर्ज मुदत 14 ऑगस्ट 2024 पर्यंत
हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Form Status Pending: तुमचा पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडिंग? मग हे वाचा
लाडकी बहीण योजनेबाबत Ladki Bahin Yojana Check Payment Status अधिक माहिती साठी संपर्क करा:
- टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक: १८०० २३३ ६४४०
अधिक माहितीसाठी:
FAQ’s
how to check ladli behna yojana payment status?
Paid money check
लडकी बहुत अच्छे पैसे आले नाहीत
BOUNCE CHE PYSE AAL NHI AAHET
मुलभूत गरजा पूर्ण करण्यास मदत होईल