मुंबई, ३० जुलै २०२४: Mukhyamantri Annapurna Yojana: महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना यांच्या लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत (free gas cylinder)देण्यात येणार आहेत.
Mukhyamantri Annapurna Yojana या योजनेची घोषणा राज्याचा अर्थसंकल्प २०२४-२५ सादर करताना करण्यात आली होती. गरिबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. याअंतर्गत राज्यातील अनेक कुटुंबांना गॅस जोडणी देण्यात आली आहे.
मात्र, एकदा सिलेंडर संपल्यानंतर दुसरा सिलेंडर भरण्यासाठी अनेक कुटुंबे आर्थिक अडचणींना तोंड देतात. त्यामुळे पुन्हा लाकडाचा वापर सुरू होतो, ज्याचा परिणाम आरोग्यावर होतो. या पार्श्वभूमीवर, “Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra” राज्यातील लाखो कुटुंबांना मोठा दिलासा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कोण असेल पात्र?
“मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra” चा लाभ घेण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत.
- लाभार्थ्यांची गॅस जोडणी महिलांच्या नावावर असणे बंधनकारक आहे.
- राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे सुमारे ५२.१६ लाख लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे कुटुंबही या योजनेचा लाभ घू शकतील.
- रेशन कार्डनुसार एका कुटुंबातील केवळ एकाच लाभार्थ्यास या योजनेचा लाभ मिळेल.
- १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरधारकांनाच हा लाभ मिळेल.
योजनेची कार्यपद्धती
“मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र (Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra)” अंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे (free gas cylinder) वितरण तेल कंपन्यांकडूनच करण्यात येणार आहे.
- सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम (सरासरी रु. ८३०/-) ग्राहकांकडून घेतली जाते. त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी सबसिडी (रु. ३००/-) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- त्याच धर्तीवर, “Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra” अंतर्गत राज्य शासनाकडून देण्यात येणारी रक्कम (अंदाजे रु. ५३०/-) थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
- तेल कंपन्यांनी राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची यादी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. तसेच, लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
“Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra”: एक महत्वाचे पाऊल
“मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र” ही योजना राज्यातील गरिबांना मोठा दिलासा देणारी आहे. स्वच्छ इंधनाचा वापर वाढवून आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच, त्यांच्या आर्थिक ओझ्यातही घट होण्यास मदत होईल.
हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Form Status Pending: तुमचा पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडिंग? मग हे वाचा
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ
या योजनेअंतर्गत, महाराष्ट्रातील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडर मोफत (free gas cylinder) दिले जातील. यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी यांचा समावेश आहे. या योजनेची उद्दिष्टे अशी आहेत:
- आर्थिक सुट: गॅस सिलिंडरच्या पुनर्भरणाची मोफत सुविधा मिळाल्यामुळे कुटुंबांना आर्थिक सुट मिळेल.
- आयुष्यमान सुधारणा: स्वच्छ इंधन वापरल्यामुळे कुटुंबांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल.
- वृक्षतोड थांबवणे: स्वच्छ इंधनामुळे वृक्षतोड कमी होईल आणि पर्यावरणाची सुरक्षा होईल.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी देखील ३ गॅस सिलिंडर मोफत (free gas cylinder) प्रदान केले जातील. या योजनेतील लाभार्थ्यांना एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलिंडर प्रदान केले जाणार नाही. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे क्षेत्रामध्ये प्रशासनाने विशेष उपाययोजना राबवाव्यात.