Ladka Bhau Yojana Online Apply:मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Ladka Bhau Yojana Online Apply: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे राबवण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने'(लाडका भाऊ योजना) ची माहिती

राज्यातील युवकांना शिक्षणानंतर नोकरी व व्यवसाय मिळवण्यास मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ (लाडका भाऊ योजना) सुरू केली आहे. ही योजना 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात येत आहे. योजनेचा मुख्य उद्देश युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवणे हा आहे.

लाडका भाऊ योजना योजनेचे स्वरूप

१. उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया

  • ऑनलाईन नोंदणी: बारावी पास, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या युवकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.
  • वयोमर्यादा: १८ ते ३५ वर्षे वयोगटातील युवकांना या योजनेत सहभागी होता येईल.
  • महाराष्ट्राचा रहिवासी: उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा व त्याची आधार नोंदणी व बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे.

२. आस्थापनांची नोंदणी प्रक्रिया

  • उद्योगांची पात्रता: लघु व मध्यम उद्योग, मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, सरकारी आणि निमसरकारी आस्थापना, सामाजिक संस्था इ. या योजना सहभागी होण्यासाठी पात्र असतील.
  • नोंदणी आवश्यकता: उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT आणि उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी.
  • मनुष्यबळाची मागणी: आस्थापनांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन पद्धतीने नोंदवावी लागेल.

३. प्रशिक्षणाचे स्वरूप

  • कार्यकाल: उमेदवारांना सहा महिन्यांचे प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देण्यात येईल.
  • स्टायपेंड: प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना शासनाद्वारे स्टायपेंड देण्यात येईल. १२ वी पास उमेदवारांना ६,००० रुपये, आयटीआय/पदविका धारकांना ८,००० रुपये आणि पदवीधर/पदव्युत्तर उमेदवारांना १०,००० रुपये दरमहा स्टायपेंड दिले जाईल.
  • अनुभव प्रमाणपत्र: प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबधित आस्थापनाकडून अनुभव प्रमाणपत्र दिले जाईल.

४. ऑनलाईन सुविधा Ladka Bhau Yojana Online Apply

  • लाडका भाऊ योजना संकल्पनेचे अंमलबजावणी: योजनेचे सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. यामध्ये उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्स्थती नोंदवणे, स्टायपेंड अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबींचा समावेश असेल.

लाडका भाऊ योजना उमेदवार व आस्थापनांची पात्रता

उमेदवारांची पात्रता

  • वयोमर्यादा: उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे.
  • शिक्षण: उमेदवाराचे शिक्षण बारावी पास, आयटीआय, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर असावे.
  • रहिवासी: उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • आधार व बँक खाते: उमेदवाराची आधार नोंदणी व बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे.
  • नोंदणी क्रमांक: कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संके तस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

आस्थापनांची पात्रता

  • राज्यातील आस्थापना: आस्थापना महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावी.
  • नोंदणी: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संके तस्थळावर नोंदणी केलेली असावी.
  • स्थापना: आस्थापनाची स्थापना किमान ३ वर्षांपूर्वीची असावी.
  • नोंदणी आवश्यकता: EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT आणि उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी.
Ladka Bhau Yojana Online Apply

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Ladka Bhau Yojana Official Website:

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी महा स्वयम वेबसाइट वर जाऊन आवश्यक ती नोंदणी करावी. या नोंदणी प्रक्रियेत, उमेदवारांना आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. वेबसाइटवर उमेदवारांना सविस्तर मार्गदर्शन आणि सहाय्य उपलब्ध आहे.

Click Here: :Ladka Bhau Yojana Maharashtra Online Apply

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना Ladka Bhau Yojana महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. या योजनेमुळे युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल व त्यांची रोजगारक्षमता वाढेल. योजनेची लाडका भाऊ योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यानंतर युवकांना व आस्थापनांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana Form Status Pending: तुमचा पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडिंग? मग हे वाचा

Leave a Comment