Ladka Bhau Yojana Criteria Eligibility:मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना पात्रता, अर्ज प्रक्रिया

Ladka Bhau Yojana Criteria: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर राज्य सरकारने लाडक्या भावांसाठी ‘मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना’ जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील तरुणांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातून या योजनेची घोषणा केली. विरोधकांच्या “लाडकी बहीण योजना तर लाडक्या भावांसाठी काय?” या सवालाचे उत्तर म्हणून ही योजना आणली आहे.

लाडका भाऊ योजना: मुख्य वैशिष्ट्ये

योजनेचे उद्दिष्ट

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा उद्देश राज्यातील युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे.

आर्थिक सहाय्य

या योजनेतून तरुणांना दरमहा 10,000 रुपयांपर्यंत स्टायपेंड दिला जाईल. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, डिप्लोमा धारकांना 8,000 रुपये, आणि पदवीधरांना 10,000 रुपये स्टायपेंड मिळेल.

Ladka Bhau Yojana Eligibility Criteria: पात्रता निकष

लाडका भाऊ योजना Eligibility Criteria खालीलप्रमाणे आहेत:

वयाची अट

  • उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असावे.

शिक्षणाची अट

  • बारावी पास, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन Ladka Bhau Yojana Criteria केलेले तरुण या योजनेसाठी पात्र असतील.
  • शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत पात्र असणार नाहीत.

रहिवासी अट

  • उमेदवार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.

इतर अटी (Ladka Bhau Yojana Criteria)

  • उमेदवाराचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
  • उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे:
    • आधार कार्ड
    • पत्त्याचा पुरावा
    • वय प्रमाणपत्र
    • चालक परवाना
    • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
    • मोबाइल नंबर
    • पासपोर्ट आकाराचा फोटो
    • बँक खाते पासबुक

अर्ज प्रक्रिया

लाडका भाऊ योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्त यांच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.

Ladka Bhau Yojana Online Apply:मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या ‘महास्वयंम’ या पोर्टलचं अनावरण.

Ladka Bhau Yojana Official Website

https://mahaswayam.gov.in या पोर्टलवर उमेदवारांना आणि उद्योग- व्यवसायांना, आस्थापनांना नोंदणी करता येणार.

प्रशिक्षण आणि स्टायपेंड

या योजनेअंतर्गत तरुणांना कारखान्यात वर्षभर अप्रेंटीसशिप(Ladka Bhau Yojana Criteria) करावी लागणार आहे. अप्रेंटीसशिपमधून कार्यानुभव मिळाल्यावर सरकार स्टायपेंडची रक्कम संबंधित आस्थापनाला भरणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना प्रमाणपत्र दिले जाईल.

Ladka Bhau Yojana Official Website

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची अधिकृत माहिती

अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रिया उपलब्ध होईल: https://rojgar.mahaswayam.gov.in/

Leave a Comment