CM Baliraja Free Electricity Scheme: लाखो शेतकऱ्यांना दिलासा, सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कायम, महावितरणला मोठा निधी मंजूर

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना (CM Baliraja Free Electricity Scheme) पुढील पाच वर्षांसाठी सुरूच ठेवण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. महावितरणला एकाच दिवसात तब्बल 3,826 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील 7.5 एचपी पर्यंतचे कृषी पंपधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना काय आहे?

राज्यातील शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी 28 जून 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी CM Baliraja Free Electricity Scheme मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केली होती. जागतिक वातावरणीय बदलामुळे शेतीवर मोठा परिणाम होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या योजनेंतर्गत 44.03 लाख शेतकरी लाभार्थी असतील, आणि त्यांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. सरकारने या योजनेसाठी 14,760 कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे.

योजनेचा कालावधी आणि अंमलबजावणी

  • एप्रिल 2024 ते मार्च 2029 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना सुरू राहणार आहे.
  • तीन वर्षांनंतर योजनेच्या कालावधीचा पुनरावलोकन करण्यात येणार आहे.
  • या CM Baliraja Free Electricity Scheme योजनेच्या निधीसाठी सरकारने मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे.

हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Form Status Pending: तुमचा पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडिंग? मग हे वाचा

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी पात्रता कोणती?

  • 7.5 एचपी पर्यंत शेतीपंप असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • महाराष्ट्रात एकूण 47.41 लाख कृषी पंप ग्राहक आहेत, त्यातील 44.03 लाख शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.
  • 7.5 एचपीपेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप असलेल्या शेतकऱ्यांना मात्र वीजबिल भरावे लागणार आहे.

योजनेबाबत विरोधकांच्या शंका आणि सरकारचा खुलासा

काही राजकीय पक्षांनी ही CM Baliraja Free Electricity Scheme योजना बंद होईल अशी शक्यता व्यक्त केली होती. मात्र, सरकारने ही योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आणि मोठा निधी वितरित करून त्याची अंमलबजावणी सुरू ठेवली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

वीजनिर्मिती आणि शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय!
✔️ 38 उदंचन जलविद्युत प्रकल्प → ₹2.95 लाख कोटी गुंतवणूक, 90,000 रोजगार
✔️ मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना → 45 लाख कृषी पंपांसाठी मोफत वीज#Maharashtra #RenewableEnergy #FarmersWelfare pic.twitter.com/fSJ4zq17MG— AIR News Pune (@airnews_pune) March 10, 2025

Leave a Comment