लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार, महिलांना मोठा दिलासा
Rakshabandhan Gift:गेल्या अनेक दिवसांपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने आता या हप्त्याचे वितरण करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे Rakshabandhan Gift याविषयीची चर्चा आता थांबली आहे. हा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, ज्यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होणार आहे.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पैसे जमा होणार
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाभार्थी महिलांना वितरित केला जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना सणापूर्वीच आर्थिक मदत मिळणार आहे. या घोषणेमुळे ladki bahin yojana july यावर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
हे हि वाचा: Ladki Bahin Yojana June Status: २६ लाख अपात्र, १४ हजार पुरुष लाभार्थी!
थेट बँक खात्यात होणार हस्तांतरण
या योजनेअंतर्गत मिळणारा सन्मान निधी थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT) पद्धतीने महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. यामुळे कोणताही मध्यस्थ नसेल आणि पैसे थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील. पारदर्शकतेसाठी सरकारने ही पद्धत निवडली आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र महिलेला तिच्या हक्काचे १५०० रुपये वेळेवर मिळतील.
गेल्या अनेक दिवसांपासून होती प्रतीक्षा
यापूर्वी, जुलै महिन्याचा हप्ता रखडल्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते. बँक खात्यांमधील त्रुटी, आधार लिंक नसणे आणि अपात्र अर्जदारांची तपासणी यांसारख्या कारणांमुळे हप्त्याला विलंब झाल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर, Rakshabandhan Gift रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पैसे देण्याचा निर्णय हा एक मोठा दिलासा देणारा आहे. तसेच, ladki bahin yojana july या चर्चेला आता अधिकृत दुजोरा मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हे हि वाचा: Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2025: शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग!