Ladki Bahin Yojana 6th Installment: महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक मोठा आधार बनली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा ₹1500 थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता सहाव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
सहाव्या हप्त्याचे वितरण कधी?
राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सरकारच्या स्थापनीनंतर Ladki Bahin Yojana 6th Installment जारी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दिवाळीनंतर महिलांना नोव्हेंबरमध्ये चौथा आणि पाचवा हफ्ता एकत्र ₹3000 जमा करण्यात आला होता. मात्र, आता सहाव्या हप्त्याचे ₹2100 लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने जमा केले जातील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
विधानसभा निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजनेने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले. या योजनेच्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी आणखी मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत येत्या काही महिन्यांत महिलांना दरमहा ₹1500 ऐवजी ₹2100 दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Next Installment Date: दुसऱ्या टप्प्यात 50 लाख महिलांना लाभ, तारीख पहा
लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा तपासावा?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींनी त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम किंवा स्टेटस तपासण्यासाठी खालील प्रक्रिया वापरावी:
- अधिकृत वेबसाइटवर https://testmmmlby.mahaitgov.in/ जा.
- लाभार्थी स्टेटस ऑप्शनवर क्लिक करा.
- मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबरद्वारे लॉगिन करा.
- कॅप्चा कोड टाकून ओटीपीद्वारे प्रक्रिया पूर्ण करा.
हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Form Status Pending: तुमचा पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडिंग? मग हे वाचा
निवडणुकीतील लाडकी बहीण योजनेचा प्रभाव
Ladki Bahin Yojana 6th Installment आणि योजनेची लोकप्रियता निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी गेमचेंजर ठरली आहे. निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या योजनेचे कौतुक केले. राज्यातील महिलांनी महायुतीच्या समर्थनात मतदान करून योजनेचा अभूतपूर्व प्रतिसाद दिला, असे मत अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केले आहे.
Ladki Bahin Yojana ही महिलांसाठी केवळ आर्थिक मदतीची योजना नाही, तर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचे एक साधन आहे. लवकरच सहाव्या हप्त्याचे वितरण होईल, तसेच वाढीव रकमेच्या घोषणेमुळे महिलांसाठी ही योजना अधिक लाभदायक ठरेल.