इतका मोठा खलनायक असून सुद्धा या व्यक्तीला घाबरत असे प्राण, फक्त 1 रुपयात बॉबी फिल्म साइन केली होती

इतका मोठा खलनायक असून सुद्धा या व्यक्तीला घाबरत असे प्राण, फक्त 1 रुपयात बॉबी फिल्म साइन केली होती

बॉलिवूडमध्ये असे काही खलनायक आहेत जे तुम्हालाही आठवत असतील. आणि अश्यावेळी जेव्हा जेव्हा कोणी ‘बरखुरदार’ आणि ‘बेटा साई’ हे शब्द वापरतात तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच नाव येते आणि ते आहे प्राण!

प्राण हे असे एक कलाकार होते ज्यांनी आपल्या वाईट आणि चांगल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली होती. आजच्या या खास पोस्ट मध्ये आम्ही आपल्याला प्राण या कलाकारा बद्दल काही गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित यापूर्वी तुम्हाला माहिती नव्हत्या.

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 4 दिवस अगोदर प्राण आणि त्याची पत्नी व एक वर्षाचा मुलगा लाहोर येथून मुंबई येथे आले होते. या फाळणीमुळे त्याचा पाळीव कुत्रा हरवला होता, ज्याचा तो खुप आवडता होता. असं म्हणतात की प्राण त्या कुत्र्याच्या आठवणीत खूप रडायचा.

इतकेच नाही तर प्राणने त्याच्या आठवणीत मुंबईत बुलेट, व्हिस्की आणि सोडा नावाचे कुत्रे पाळली होती. मुंबईत आल्यानंतर सुमारे 8 महिन्यांनंतर प्राण यांना 1948 साली प्रसिद्ध लेखक सआदत हसन मंटोच्या मदतीने शहीद लतीफच्या ‘जिद्दी’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

आणि याचबरोबर, तुम्हाला हे माहिती आहे का जीवनात असा यशस्वी झालेला अभिनेता प्राण याचे पूर्ण नाव प्राण कृष्ण सिकंद असे होते आणि त्यांना कधीच अभिनेता होण्याची इच्छा नव्हती. प्राणला फोटोग्राफर व्हायचं होतं ज्यासाठी त्याने दिल्लीत असलेल्या ‘अ दास एन्ड कंपनी’ साठी छायाचित्रण शिकण्यासाठी काम केले होते. परंतु ते म्हणतात की नशीब केवळ आपल्या कौशल्यांचा परिचय देत नाही. त्यानंतर त्यांनी रामलीलामध्ये काम केले जिथून त्यांच्या मनात अभिनयाची आवड निर्माण झाली.

पण आपल्या अभिनय कारकिर्दीबद्दल वडिलांना सांगण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती. प्राणच्या वडिलांसह संपूर्ण कुटुंब त्याच्या अभिनयाच्या बाबतीत विरोधात होते. त्याला आपल्या वडिलांची इतकी भीती वाटत होती की त्यांनी त्यांच्या पहिल्या ब्रेकबद्दल कोणालाही सांगितले नाही.

1940 मध्ये जेव्हा त्यांना ‘यमला जट’ या पंजाबी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.मनात हिम्मत केली आणि त्यांनी आपल्या वडिलांना आपल्या अभिनयाबद्दल सांगायची हिम्मत केली. हळूहळू त्याचे अभिनयावरचे प्रेम इतके वाढले की त्याने ‘बॉबी’ हा चित्रपट फक्त 1 रुपयात साइन केला.

इतकेच नाही तर प्राण त्याच्या फी साठी खूप चर्चेत होता. कारण त्यावेळी अशी बातमी होती की त्याला राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त फी मिळायची. सतत खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर प्राणला अमिताभ बच्चन यांच्यासमवेत ‘जंजीर’ हा चित्रपट मिळाला होता पण या भूमिकेसाठी अगोदर देव आनंद, राज कुमार आणि धर्मेंद्र यांसारख्या स्टार लोकांना ऑफर मिळाल्या होत्या.

त्यानंतर वयामुळे 1990 पासून त्यांनी चित्रपटात काम करणे थांबवले आणि 2013 मध्ये 12 जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *