‘या’ कपाटात लपली आहे मांजर; शोधा बरं तुम्हाला सापडतेय का?

‘या’ कपाटात लपली आहे मांजर; शोधा बरं तुम्हाला सापडतेय का?

तुमच्या घरात कुत्रा, मांजर असा कोणी पाळीव प्राणी असल्यावर त्यांना शोधणं हे तुमच्यासाठी नवं नाही. घरातील एखाद्या कोणत्यातरी कोपऱ्यात ते लपून बसतात आणि मग त्यांना शोधपर्यंत मालकाचीही दमछाक होते. सोशल मीडियावर नेटिझन्सदेखील सध्या अशाच एका मांजरीला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

एका महिलेनं आपल्या ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे आणि त्यात आपली मांजर कुठे लपली आहे, हे शोधण्यास सांगितलं आहे.

पत्रकार असलेल्या केट हिंड्स यांनी ट्विटवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक मोठं कपाट आहे. या कपाटात अनेक वस्तू आहेत आणि त्यामध्ये एक मांजर लपली आहे, केट यांनी नेटिजन्सना या मांजरीला शोधण्यास सांगितलं.

यानंतर नेटिझन्स तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

अनेकांनी मांजरीला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मांजर काही सापडली नाही.तर काही जणांना सुरुवातीला थोडं कठीण वाटलं मात्र त्यांना अखेर मांजर सापडलीच. बरं तुम्हाला सापडली का ती मांजर?

ही मांजर नेमकी कुठे लपली आहे, तेदेखील शेवटी केट यांनी सांगितलं. कपाटातील तो टीव्ह नीट पाहा. बरोबर त्याच्या खालीच ह पांढरीशुभ्र मांजर लपून बसली आहे. जिनं लपाछपीच्या या खेळात नेटिझन्सना चांगलंच हरवलं आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *