‘या’ क्रिकेटपटूंनी स्वत: च्या मित्राचेच घर केले उध्वस्त (बर्बाद), एकाने तर मित्राला न सांगताच त्याच्या बायकोशी…

‘या’ क्रिकेटपटूंनी स्वत: च्या मित्राचेच घर केले उध्वस्त (बर्बाद), एकाने तर मित्राला न सांगताच त्याच्या बायकोशी…

“प्यार किया तो डरना क्या” होय अगदी अशीच काहीसी क्रिकेटर्सचीही एक कथा आहे. जी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या जोडीदाराच्या बायकाशी लग्न केले आहे. एकाच संघाकडून खेळल्यामुळे क्रिकेटर्स आपापसांत खूप चांगले मित्र बनतात. यामुळे ते एकमेकांच्या घरी सतत भेट देत असतात. अशा परिस्थितीत, त्याच्या जोडीदाराच्या पत्नीकडे त्यांची भावूक नजर जाते.

भारतीय संघाचा स्फोटक खेळाडू मुरली विजयने 2012 मध्ये दिनेश कार्तिकची पहिली पत्नी निकिता बंजाराशी लग्न केले होते. दिनेश कार्तिकने निकिता बंजारा यांच्याशी 2007 मध्ये लग्न केले होते, परंतु या दोघांमधील संबंध केवळ 5 वर्षे टिकू शकले. घटस्फोट घेतल्यानंतर निकिता बंजारा यांनी मुरली विजयशी लग्न केले.

निकिता बंजारा पेशाने एक कास्टिंग आर्टिस्ट आहे जिला 3 सुंदर मुलं आहेत. निकिता बंजारा आणि दिनेश कार्तिक या दोघांचे वडील खूप चांगले मित्र होते, त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांचे लग्न करणे योग्य वाटले होते. दिनेश कार्तिकचे वयाच्या 21 व्या वर्षी निकिता बंजाराशी लग्न झाले होते.

बातमीनुसार दिनेश कार्तिक आणि निकिता बंजारा यांचा संसार फार दिवस टिकला नाही. दिनेश कार्तिक ची पत्नी निकिता बंजारा हिला दिनेश पेक्षा मुरली विजय जास्त आवडू लागला होता. यांच्यातील विवाह खंडित होण्यामागील कारण मुरली विजय आणि निकिता यांचे अफेअर होते.

दिनेश कार्तिक हा उजवा हाताचा यष्टीरक्षक फलंदाज आहे, तर मुरली विजय हा डावखुरा सलामीवीर फलंदाज आहे. दोघेही भारतीय संघाकडून क्रिकेट खेळत आहेत. एकच तिकडून खेळत असल्याने दोघेही चांगले मित्र बनले होते. तसेच दोघांचेही एकमेकांचे घरी येणे जाणे चालू होते.

श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज उपुल थरंगाने तिलकरत्ने दिलशानची पत्नी निलंका
विथनगेशी लग्न केले. तिलकरत्ने दिलशान हा श्रीलंकेचा महान फलंदाज म्हणून गणला जातो. दोघेही श्रीलंकेच्या टीम मधून खेळणारे दिग्गज क्रिकेटपटू आहेत. एकच टीम मधून खेळणारे हे दोन्ही खेळाडू चांगले मित्र देखील होते.

तिलकरत्ने दिलशानचे प्रथानुसार निलंका विथनगेशी लग्न झाले आणि त्या दोघांनाही मुलगा झाला पण काही काळानंतर दिलशान आणि निलंका यांच्यात मतभेद निर्माण झाला आणि त्यांनी आपसात एकमेकांपासून तूट घेतली.

वृत्तानुसार, दिलशानने निलंकाला घटस्फोट देण्यामागचे कारण म्हणजे निलंका आणि उपुल थरंगा यांच्यातील अंतर कमी करणे. कारण निलंका जरी दिलशानची पत्नी होती तरी देखील तीचे उपुल वर खूपच प्रेम जडले होते. म्हणून दोघांमधील प्रेमाचे चाळे बघून दिलशान ने नीलंका ला घटस्फोट देऊन मोकळी केली.

घटस्फोट दिल्यानंतर एका बाजूला जिथे उपुल थरंगाने निलंका विथंगेशी लग्न केले. त्यावेळी तिलकरत्ने दिलशानने त्याची बालपणातील मैत्रीण मंजुळाशी लग्न केले. निलंका आणि उपुल हे दोघेही आता सुखी संसार करत आहे. तर दिलशान सुध्दा त्याच्या बालपणातील मैत्रीण मंजुळा शी चांगला संसार थाटून जीवन जगत आहे.

तिलकरत्ने दिलशानने श्रीलंकेच्या संघासाठी कसोटी सामन्यात 5492 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 10290 धावा केल्या आहेत. याउलट उपुल थरंगाने आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये 1754 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 6936 धावा केल्या आहेत.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *