Video : उर्मिला मातोंडकरचे गाणे छम्मा छम्मा वर ‘या’ क्रिकेटपट्टूच्या पत्नीने केला जबरदस्त डान्स, पहा विडीयो झाला व्हायरल…

Video : उर्मिला मातोंडकरचे गाणे छम्मा छम्मा वर ‘या’ क्रिकेटपट्टूच्या पत्नीने केला जबरदस्त डान्स, पहा विडीयो झाला व्हायरल…

धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचा मागील वर्षी डिसेंबरमध्ये विवाह झाला होता. चहल आणि धनश्रीने गुरुग्राममध्ये हिंदू पद्धतीने विवाह केला. चहलने फोटो शेयर करत लिहिले होते, आम्ही वन्स अपॉन अ टाइम पासून सुरूवात केली होती आणि समजले की, आम्ही खुप आनंदी आहोत.

धनश्री वर्मा प्रसिद्ध युट्युबर देखील आहे. तिच्या नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट असतात. सोशल मीडियावर ती नेहमी तिच्या डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते. तिचे व्हिडीओ पाहून तिचे चाहते अक्षरश: वेडे होतात. नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे जो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

धनश्री वर्माचा फॅन फॉलोइंग एखाद्या बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेसपेक्षा कमी नाही. धनश्री वर्माचे व्हिडिओ यूट्यूबवर खुप ट्रेंड करतात. धनश्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. नुकत्याच वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा उर्मिला मातोंडकरचे गाणे ’छम्मा छम्मा’वर डान्स करताना दिसत आहे. तुम्ही सुद्धा पहा तिच्या या डान्सचा वायरल व्हिडिओ.

या डान्समधील तिची एनर्जी जबरदस्त आहे. डान्स दरम्यान तिने केलेले मुव्हज पाहून चाहते नक्कीच घायाळ होतील. तिच्या या व्हिडीओला आतापर्यंत 7 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तिच्या डान्सवर चाहते प्रतिक्रिया देत आहे. धनश्री वर्माच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या 25 लाखांपेक्षा जास्त आहे.

तर यू-ट्यूबवर सुद्धा तिच्या सबस्क्रायबरची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे. याबाबतची माहिती स्वत: तिने आपली इंस्टाग्राम स्टोरी शेयर करून दिली होती. हा व्हिडिओ लोक खुप पसंत करत आहेत. धनश्रीने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, हे माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे. हा डान्सचा व्हिडिओ शेअर करण्यासाठी मी खूप वाट पहात होते. धनश्री नेहमीच तिच्या डान्सचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

युजवेंद्र चहल सुद्धा अशाप्रकारे आपल्या फनी व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर सक्रिय असतो. युजवेंद्र बद्दल सांगायचं झालं तर तो आयपीएलच्या १४ व्या सीझनसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या जर्सीमध्ये दिसण्यासाठी पूर्ण तयार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी आयपीएल सुरु होण्याची आतुरतेने वाट पहात आहेत. दरम्यान, अलिकडेच झालेल्या आयपीएल 2020 मध्ये युजवेंद्र ला चीयर करण्यासाठी धनश्री दुबईत देखील गेली होती.


चहलने धनश्रीला लॉकडाऊन सुरु असताना प्रपोज केले होते आणि त्यानंतर या दोघांनी काही दिवसांमध्येच साखरपुडा केला होता. आज अखेर या दोघांनी लग्न केल्याचे पाहायला मिळाले. धनश्री ही चांगली डान्सर आहे आणि तिच्या या कौशल्यावरच चहल फिदा झाला होता. त्यामुळेच चहलने धश्रीला लग्नाबाबत विचारले होते आणि त्यानंतर धनश्रीने चहलला होकार दिला होता.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *