मनोरंजन

वयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है

सध्या भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे भारतात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील घरातच आहेत. प्रत्येकजण घरात राहून आपापल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.

सध्या अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय आहेत. ते आपले अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. एवढेच नव्हे तर लाइव्ह चॅटद्वारे आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहात आहेत.

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमाळकरदेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिच्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती खूपच छान दिसत असून हा फोटो काढला त्यावेळी ती केवळ २० वर्षांची होती. तिनेच या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे की, मी २० वर्षांची असताना…

View this post on Instagram

Me at 20 ! Memories ❤️ . . #apurvanemlekar #goodolddays #meat20

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on


अपूर्वाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोला १५ तासांत २५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून अपूर्वाचे फॅन्स या फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत. काहींनी या फोटोत तुला ओळखता देखील येत नाहीये असे म्हटले आहे तर तू खूपच सुंदर दिसतेस अशी कमेंट अनेकांनी या फोटोवर केली आहे.

अपूर्वाचा या फोटोतील लूक खूपच वेगळा आहे. अपूर्वाचे केस खूपच छोटे असून ती हा फोटो काढला त्या वेळात ती खूपच बारीक होती असे आपल्याला पाहायला मिळत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close