बॉलीवूड

वयाच्या 15व्या वर्षी शूटिंगदरम्यान या अभिनेत्यानं रेखा यांना केला होता बळजबरीने किस.

बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्री रेखा या कित्येक दशकांपासून सिनेइंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहेत. त्या त्यांच्या सौंदर्य व अदाकारीसाठी ओळखल्या जातात. पन्नास वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी जवळपास १८० चित्रपटात काम केले आहे. रेखा यांनी ६०च्या दशकात आपल्या सिनेकरियरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.

रेखा यांचे व्यावसायिक जीवन जितके गाजले तितकेच त्यांचे खासगी जीवन वादग्रस्त ठरले. त्यांच्या खासगी जीवनाविषयी कुणालाच फारसे माहित नाही. प्रत्येकाकडे रेखा यांच्या खासगी जीवनाविषयी उलटसुलट माहिती आहे. त्यापैकी अमिताभ बच्चन यांच्यावर असलेलं प्रेम त्या कधीच लपवू शकल्या नाहीत हेही उघड आहे. रेखा यांचा हा जीवन प्रवास वर्णन करणारे पुस्तक यासिर उस्मान यांनी लिहले आहे.

रेखा- ऍन अनटोल्ड स्टोरी या पुस्तकात यासिर यांनी रेखा यांच्या खासगी जीवनाबाबत अनेक धक्कादायक खुलासे जगासमोर आले . यापैकी एक खुलासा ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरस्टारसह स्क्रीन शेअर करणाऱ्या रेखा यांच्या जीवनातील हे रहस्य फारसं कुणालाच माहिती नव्हते. मात्र या पुस्तकाच्या निमित्ताने हे जगासमोर आले आहे. या पुस्तकातील संदर्भांनुसार रेखा यांना वयाच्या 16व्या वर्षी लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला होता.

‘अंजाना सफर’ या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी दिग्दर्शकानं रेखा यांना फसवले होते. त्यांना न सांगताच रोमँटिक सीन दिग्दर्शकाने सिनेमात टाकला होता. सिनेमातील सीन बदलण्यात आल्याची रेखा यांना बिल्कुल कल्पनाही नव्हती.

सीनच्या चित्रीकरणावेळी दिग्दर्शकाने अॅक्शन म्हणताच अभिनेता विश्वजीतने रेखा यांना आपल्या कवेत घेतले आणि त्यांना किस करण्यास सुरुवात केली. या सगळ्याची रेखा यांना जराही कल्पना देण्यात आली नसल्याने नेमके काय सुरु आहे हे त्यांना कळलेच नाही.

हा किसिंग सीन जवळपास 5 मिनिटे सुरु होता. काही तरी वेगळेच सुरु असल्याचे मग रेखा यांना जाणवले. त्यांनी स्वतःला विश्वजीत यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र विश्वजीत यांनी रेखा यांना सोडले नाही. मात्र या सगळ्या प्रकारानंतर रेखा यांना समजले की त्या लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्या आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close