उशाशी ‘या’ 5 वस्तू ठेवू नये, वाढते नकारात्मकता

उशाशी ‘या’ 5 वस्तू ठेवू नये, वाढते नकारात्मकता

काही वस्तू आहेत ज्या झोपताना आपल्या जवळपास ठेवू नये. कारण अशा वस्तूंमुळे नकारात्मकता आणि अशुभता वाढते. आपण देखील या वस्तू आपल्या उशाशी ठेवू नका.

आधुनिक उपकरणे : यंत्र नेहमीच स्वयंचलित मानले गेले आहे, हे नेहमीच चलायमान असतात. जे आपल्या शांततेला भंग करतात. जसे की घड्याळ, मोबाइल, फोन, लॅपटॉप, टीव्ही, व्हिडिओ गेम या सारख्या अनेक यंत्रांना आपल्या उशाशी ठेवण्याचा सल्ला कोणी ही ज्योतिषाचार्य देत नाही. बहुतेकांचा विश्वास असा आहे की या पासून निघणाऱ्या किरण आरोग्य आणि मानसिकतेसाठी घातक आहे.

पर्स- पाकीट: कधीही आपल्या उशाशी पर्स किंवा पाकीट ठेवू नये. हे आपल्या अनावश्यक खर्च्यात वाढ करतात. पैसे जे कुबेर आणि लक्ष्मीचे प्रतीक आहेत त्यांचं वास्तव्य नेहमी कपाटात किंवा तिजोरीमध्ये असतं. झोपण्याचा आधी हे निश्चित करावं की आपले पाकीट आपण व्यवस्थित ठेवले आहे. मग बघा आपण किती आनंदी राहता.

दोरी- साखळी: दोरी सारखी वस्तू जरी ही आपल्या दैनंदिनीमध्ये गरजेची असली तरी ही रात्रीच्या वेळी आपल्या पलंगाजवळ ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार दोरी आणि साखळी हे अशुभता आणतात. या मुळे माणसाच्या कामामध्ये व्यतता येते आणि त्याची कामे यशस्वीरीत्या होत नाही.

उखळ: वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपताना पलंगाखाली किंवा उशाशी उखळ ठेवू नये. अशामुळे नात्यात तणावाची स्थिती उद्भवते आणि माणसाची सर्व शक्ती सकारात्मक ऊर्जांमध्ये न लागता व्यर्थच विवादामध्ये लागते.

वर्तमानपत्र किंवा मासिक: वास्तुशास्त्रानुसार माणसाला आपल्या उशाशी वर्तमानपत्र किंवा मासिक सारख्या वस्तू ठेवू नये. या वस्तूंचा देखील मानवी जीवनावर प्रभाव पडतो.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *