Home » त्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार!
मनोरंजन

त्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार!

९० च्या काळात बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारल्यावर अनेकांच्या ओठी अभिनेत्री ममता कुलकर्णीचं नाव यायचं. ममताचा कलाविश्वातील वावर कमी झाला असला तरीदेखील चाहत्यांमध्ये आजही तिच्या चर्चा रंगतात. विशेष म्हणजे ममता तिच्या अभिनयापेक्षा वादग्रस्त कारणांमुळे सर्वाधिक चर्चेत राहिली.

त्या काळी टॉपलेस होऊन फोटोशूट करणारी ती बोल्ड अभिनेत्री ठरली होती. एका मासिकासाठी ममताने टॉपलेस फोटोशूट करुन अनेकांच्या नजरा वेधून घेतल्या होत्या. इतकंच नाही तर या फोटोशूटमुळे ती रातोरात सुपरस्टार झाली होती..सुरुवातीच्या काळात ममताला करिअरमध्ये मोठा संघर्ष करावा लागला.

सलमान खान, आमिर खान अशा सुपरस्टार अभिनेत्यांसोबत काम केल्यानंतरही तिच्या विशेष प्रसिद्धी मिळाली नव्हती. याच काळात तिच्याकडे १९९३ साली ‘स्टारडस्ट’ मासिकासाठी फोटोशूट करण्याची ऑफर आली. या मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट करायचं होतं.

प्रथम ममताने ही ऑफर नाकारली होती. मात्र नंतर विचार करुन तिने ऑफर स्वीकारली आणि तिच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. इतकंच नाही तर तिच्याकडे सुपरहिट चित्रपटांच्या रांगा लागल्या. १९९३ साली स्टारडस्ट या मासिकासाठी ममताने टॉपलेस फोटोशूट केलं होतं. त्या फोटोशूटसाठी प्रथम अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला या अभिनेत्रींना ऑफर देण्यात आली होती.

मात्र या अभिनेत्रींनी नकार दिल्यानंतर फोटोग्राफर जयेश सेठ यांनी ममता कुलकर्णीला या फोटोशूटसाठी विचारणा केली. मात्र ही ऑफर स्वीकारण्यापूर्वी ममताने फोटोग्राफरसमोर एक अट ठेवली. या अटीनुसार हे फोटोशूट केल्यानंतर सगळ्यात पहिले फोटो ममता स्वत: पाहिलं. ही अट मान्य केल्यानंतर फोटोशूट करण्यात आलं.

दरम्यान, हे मासिक प्रकाशित झाल्यानंतर ममता रातोरात स्टार झाली. तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या रांगा लागल्या. विशेष म्हणजे इतकंच नाही तर राकेश रोशन, राज कुमार संतोषी या सारखे दिग्गज कलाकारही तिला आपल्या चित्रपटांमध्ये घेण्यासाठी उत्सुक होते

प्रथम ममताने ही ऑफर नाकारली होती. मात्र नंतर विचार करुन तिने ऑफर स्वीकारली आणि तिच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. इतकंच नाही तर तिच्याकडे सुपरहिट चित्रपटांच्या रांगा लागल्या. १९९३ साली स्टारडस्ट या मासिकासाठी ममताने टॉपलेस फोटोशूट केलं होतं.

त्या फोटोशूटसाठी प्रथम अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला या अभिनेत्रींना ऑफर देण्यात आली होती. मात्र या अभिनेत्रींनी नकार दिल्यानंतर फोटोग्राफर जयेश सेठ यांनी ममता कुलकर्णीला या फोटोशूटसाठी विचारणा केली. मात्र ही ऑफर स्वीकारण्यापूर्वी ममताने फोटोग्राफरसमोर एक अट ठेवली. या अटीनुसार हे फोटोशूट केल्यानंतर सगळ्यात पहिले फोटो ममता स्वत: पाहिलं.

ही अट मान्य केल्यानंतर फोटोशूट करण्यात आलं. दरम्यान, हे मासिक प्रकाशित झाल्यानंतर ममता रातोरात स्टार झाली. तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या रांगा लागल्या. विशेष म्हणजे इतकंच नाही तर राकेश रोशन, राज कुमार संतोषी या सारखे दिग्गज कलाकारही तिला आपल्या चित्रपटांमध्ये घेण्यासाठी उत्सुक होते

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment