तुमचं ‘हे’ बोट सांगणार कोरोनामुळं मृत्यू होणार की नाही, शास्त्रज्ञांचा नवा दावा

तुमचं ‘हे’ बोट सांगणार कोरोनामुळं मृत्यू होणार की नाही, शास्त्रज्ञांचा नवा दावा

जगभरात कोरोना व्हायरस (Covid-19) रोगाबद्दल बर्‍याच शास्त्रज्ञांनी बरेच दावे केले आहेत. आतापर्यंत या संसर्गामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. आता काही वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की अनामिकाची (Ring fingure) लांबी पाहून पुरुषांचा कोरोनामुळं मृत्यू होणार की नाही याचा अंदाच वर्तवला जाऊ शकतो.

शास्त्रज्ञांच्या मते जर एखाद्या पुरुषाची अनामिका महणजेच रिंग फिंगर लांब असेल तर कोरोनामुळे इतर लोकांपेक्षा त्याच्या मृत्यूची शक्यता कमी असते किंवा त्यामध्ये सौम्य लक्षणे देखील असू शकतात.

ब्रिटनच्या विद्यापीठानं केला रिसर्च

ब्रिटनमधील वेल्स येथील स्वानसी विद्यापीठाने हे संशोधन केलं आहे. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी 41 देशांमधील रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे. यात असे आढळून आले आहे की, ज्या देशांमध्ये पुरुषांच्या अनामिकेची लांबी कमी आहे, तेथे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

दरम्यान असे का घडत आहे, याबाबत अद्याप अभ्यास सुरू आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की कोरोना, ज्याला SARS-CoV-2 देखील म्हटले जातं. ते जेव्हा शरीरात प्रवेश करतं तेव्हा रिसेप्टर्सद्वारे संक्रमण करतात.

मात्र काही संशोधनात असेही दिसून आलं आहे की, टेस्टोस्टेरॉनपासून उच्च दर्जाचे ACE-2 रिसेप्टर्स फुफ्फुसांचे नुकसानापासून संरक्षण करू शकतात, ज्यामुळे कोरोनाचा प्रसार होत नाही. गर्भधारणेदरम्यान हे टेस्टोस्टेरॉन गर्भाला मिळते, अनामिकेची लांबी गर्भाशयात किती टेस्टोस्टेरॉन आहे हे दर्शवते.

या देशांमध्ये फरक दिसून आला

ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या म्हणण्यानुसार, इंग्लंड आणि वेल्समध्ये कोरोनामुळं 1 लाख लोकांचा मृत्यू झाला. यात पुरुषांची संख्या 97.5 % आहे तर महिलांची 46.5 %. संशोधकांना असे आढळले की मलेशिया, रशिया आणि मेक्सिकोमध्ये पुरुषांच्या अनामिकेची लांबी जास्त असलेल्या पुरुषांमध्ये प्रजनन दर कोरोनापेक्षा कमी होता.

त्या तुलनेत ब्रिटन, बल्गेरिया आणि स्पेनमध्ये पुरुषांच्या अनामिकेची लांबी कमी आहे तर प्रजनन दर जास्त आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *