साऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…

साऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…

गेल्या काही वर्षांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटाचा ट्रेंड चांगलाच रुजायला सुरुवात झाली आहे. दक्षिणात्य चित्रपटाचे हिंदीत रिमिक्स करण्याचा ट्रेंड पण गेल्या काही वर्षात चांगलाच बॉलीवूडने मनावर घेतलेला दिसतो. यात आमिर खानचा गजनी या चित्रपटाचे प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल. तसेच काही वर्षांपूर्वी आलेल्या अजय देवगन याचा दृश्यम हा चित्रपट देखील दाक्षिणात्य रिमिक्स होता.

असे अनेक चित्रपट बॉलिवुडला मिळालेले आहेत. या प्रमाणेच हिंदी चित्रपटात काम केल्यानंतर अनेक अभिनेत्री दक्षिणेमध्ये आपले नशीब आजमावतात. तसेच अमिताभ बच्चनपासून राजेश खन्ना यांनी देखील बॉलिवूडमध्ये नाव कमावले. नंतर त्यांनी दक्षिणेत काम केले आहे. दक्षिणेत काम करण्याचा मुख्य हेतू म्हणजे तिकडे पैसा हा अधिक मिळतो. अनेक कलाकारांनी बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळवून दक्षिणेत पैसा कमावल्याचे पाहायला मिळते.

अनेक अभिनेत्री या बॉलिवूडमध्ये काम करून दक्षिणेत काम करतात. यात माधुरी दीक्षितपासून आजपर्यंत अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनी तर दक्षिणेसोबत बॉलिवूडमधील देखील आपला डंका वाजवला आहे. दक्षिणेतील चित्रपट म्हटले की, ॲक्शन थ्रीलर मिक्स मसाला असतो.

स्पेशल इफेक्ट्स आणि प्रचंड हाणामारी अशा धाटणीचे चित्रपट दक्षिणेत बनतात. त्यात काम करण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार देखील स्वतःला रोखू शकली नाहीत. त्यामुळे ते दक्षिणेत अनेक चित्रपटात काम करताना पाहायला मिळतात. आता आलिया भट देखील दक्षिणेत काम करणार आहे.

दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक नाग अश्विन हे एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट करत आहेत. यामध्ये बाहुबली फेम अभिनेता प्रभास दिसणार आहे. हा एक जबरदस्त ॲक्शन चित्रपट असणार आहे. या चित्रपटासाठी अश्विन यांनी आधी दीपिका पदुकोण हिला विचारणा केली होती. मात्र, काही कारणांमुळे तिची चित्रपटासाठी निवड झाली नाही. त्यानंतर कॅटरिना कैफ हिलादेखील नाग यांनी विचारणा केली होती.

मात्र, तिचीही चित्रपटासाठी निवड झाली नाही. त्यानंतर आलिया भट हिला विचारणा करण्यात आली. आलिया भट्टने या चित्रपटासाठी अश्विन यांना होकार दिला. बॉलिवूडमध्ये सध्या आलिया भट ही सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून गणल्या जाते. या चित्रपटाचे नाव अजून ठरले नाही. मात्र, हा चित्रपट प्रचंड ऍक्शन थ्रिलर असणार आहे.

यामध्ये भरपूर स्पेशल इफेक्ट असणार आहेत. सध्या आलिया ही गंगुबाई काठीयावाडी, ब्रह्मास्त्र आणि सडक २ या चित्रपटात काम करत आहे. याआधी देखील आलीयाला अनेक दक्षिणात्य चित्रपटांमधून विचारणा झाली होती. मात्र, तिने ते चित्रपट केले नाही. आता ती एस एस राजमौली यांच्यासोबत देखील एका चित्रपटात दिसणार आहे

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *