मनोरंजन

सोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकणारे ‘हे’ चिमुरडे आहेत तरी कोण?? जाणून घ्या…

सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे. जगाच्या एका कोपऱ्यात एखाद्या व्यक्तीने केलेलं एक काम हे काही मिनीटांमध्ये संपूर्ण जगाला परिचीत होतं. लॉकडाउन काळात अनेक लोकांनी आपले छंद जोपासतं त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करायला सुरुवात केली आहे. गेले काही दिवस सोशल मीडियावर, मराठी आणि हिंदी चित्रपटातील गाणी गाणारी दोनं लहानगी मुलगं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

अर्जुन आणि अर्णव अशी या दोन मुलांची नाव असून ते ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात राहतात. अमेय आणि सपना मंजेश्वर या दाम्पत्याची मुलं गेले काही दिवस सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहेत. अर्जुन आणि अर्णव या दोघांचा जन्म मुळचा ऑस्ट्रेलियाचा, तरीही इतक्या लहान वयात या मुलांनी मराठी आणि हिंदी भाषा चांगली अवगत केली आहे.

दोन्ही मुलांना गाणी म्हणण्याची आवड आहे, लॉकडाउन काळात आपले आई-बाबा आणि नातेवाईकांसमोर गाणी म्हणून दाखवताना मंजेश्वर दाम्पत्याला या दोन भावांचं यु-ट्यूब चॅनल काढण्याची कल्पना सुचली. यानंतर यू-ट्युबवर Manjeshwar Brothers या नावाने अर्जुन आणि अर्णवचं खास चॅनल काढण्यात आलं.

मोबाईलवर रेकॉर्ड केलेली गाणी अमेय आणि सपना यांनी यू-ट्युब चॅनलवर अपलोड करायला सुरुवात केली. फार कमी कालावधीत त्यांच्या या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळायला लागला. काही मराठी कलाकारांनीही या दोन भावांचं कौतुक केलं आहे.

करोनाचा सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात अनेक नकारात्मक गोष्टी आजुबाजूला घडत असतात. अशा परिस्थितीत अर्जुन आणि अर्णव यांच्यासारख्या मुलांनी केलेले प्रयत्न प्रत्येकाच्या आयुष्यात थोडी सकारात्मकता आणि आनंद देऊन जातात यात काही शंकाच नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close