धर्मेंद्र यांच्या ‘पहिल्या’ पत्नीचे फोटो पाहिले आहेत का? दिसायला होती हेमा मालिनीपेक्षाही..!

धर्मेंद्र यांच्या ‘पहिल्या’ पत्नीचे फोटो पाहिले आहेत का? दिसायला होती हेमा मालिनीपेक्षाही..!

८० च्या दशकात एकाहून एक सुपरहिट चित्रपट बॉलिवूड ला देणाऱ्या कलाकारांपैकी अभिनेता धर्मेंद्र एक होते. त्याकाळी त्यांचा उत्तम अभिनय आणि वेगळी शैली यामुळे त्यांनी बॉलिवूड मध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले. पण गेल्या बऱ्याच काळापासून ते सद्या कलाविश्वापासून दूर आहेत.

सध्या ते त्यांचा बरासचा वेळ फार्महाऊसवर घालवत असतात. त्याचबरोबर ते सोशल मीडियावरही सतत सक्रीय असतात. त्यामुळे अनेकदा चाहत्यांमध्ये त्यांच्याविषयीची चर्चा रंगत असते. सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे ती त्यांच्या पहिल्या पत्नीची अर्थात प्रकाश कौर यांची.

अलिकडेच अभिनेता सनी देओल यांनी इन्स्टाग्रामवर आई प्रकाश कौर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रकाश कौर यांची चर्चा सुरु झाली आहे.

 

View this post on Instagram

 

Be with your family and stay safe. #mom

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol) on

सध्या लॉकडाउन सुरु असल्यामुळे सनी देओल त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. यामध्येच त्यांनी आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. सनी बऱ्याचेळा त्यांच्या आईसोबतचे फोटो शेअर करत असतात.

दरम्यान, प्रकाश कौर या प्रकाशझोतापासून लांब रहात असल्याचं पाहायला मिळतं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांनी १९५४ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी धर्मेंद्र यांचं वय केवळ १९ वर्ष असल्याचं म्हटलं जातं.

धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना सनी देओल आणि बॉबी देओल ही दोन मुलं असून ते कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. परंतु ‘शोले’ चित्रपटादरम्यान, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं सूत जुळलं आणि घरातल्यांचा विरोध पत्करुन या दोघांनी लग्न केलं.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *