‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री सोबत सलमानला करायचे होते लग्न, तिच्या वडिलांकडे घातली होती लग्नासाठी मागणी

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री सोबत सलमानला करायचे होते लग्न, तिच्या वडिलांकडे घातली होती लग्नासाठी मागणी

चावला गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करत आहे. ती जास्तीत जास्त वेळ तिच्या कुटुंबियांना देते. 1995 मध्ये जुहीने प्रसिद्ध व्यवसायिक जय मेहतासोबत लग्न केले. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत.

जुहीने नव्वदीच्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. जुहीच्या अभिनयासोबतच त्याकाळात तिच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा रंगली होती. तिच्या हास्यावर तर सगळेच फिदा होते.

केवळ सामान्य लोकच नव्हे तर बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला देखील जुही प्रचंड आवडायची. त्यानेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. या अभिनेत्याने जुहीच्या वडिलांकडे लग्नाची मागणी देखील घातली होती. जुहीचे आज लग्न झाले असले तरी हा अभिनेता आजही अविवाहित आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानने जुही चावलासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सलमानची एक जुनी मुलाखत काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या मुलाखतीत सलमान जुहीची खूप सारी प्रशंसा करत असताना आपल्याला दिसत आहे.

सलमान या मुलाखतीत सांगत आहे की, ती खूप चांगली आणि गोंडस मुलगी आहे. मी जुहीसोबत लग्न करू शकतो का असे मी तिच्या वडिलांना देखील विचारले होते. पण त्यांनी यासाठी नकार दिला.

सलमान आणि जुही अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. पण तरीही ते दोघे कधीच कोणत्या चित्रपटात नायक-नायिकेच्या भूमिकेत दिसले नाहीत. गोविंदा, अनिल कपूर आणि जुही चावला यांची मुख्य भूमिका असलेल्या दिवाना मस्ताना या चित्रपटात सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.

तसेच सलमानच्या बिग बॉस या कार्यक्रमात एकदा जुहीने तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी हजेरी लावली होती. ते दोघे कोणत्या चित्रपटात एकत्र झळकणार का याची उत्सुकता अनेक वर्षांपासून त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.

आमचे पेज लाईक करा.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *