किल्ले रायगडाचा हा अनोखा इतिहास कदाचित आपल्याला माहिती नसेल…जाणून घ्या ही खास माहिती

किल्ले रायगडाचा हा अनोखा इतिहास कदाचित आपल्याला माहिती नसेल…जाणून घ्या ही खास माहिती

रायगड हा रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगात असून समुद्री सपाटीपासून सुमारे २७०० फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी राजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून१६ व्या शतकात आपल्या राज्याची राजधानी बनवले. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला.

इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सध्या हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.

या किल्ल्याचे प्राचीन नाव ‘रायरी’ होते. युरोपचे नागरिक त्याला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड हा किल्ला दुर्गम होता. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा या किल्ल्याला ‘रासिवटा’ व ‘तणस’ ही नावे होती.

त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीमध्ये रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होत असे. यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला.

महाराजांनी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असता कल्याणचा सुभेदार मुल्ला हा खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे.

शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते.

गडावर आहे मोफत राहण्याची सोय..

गडावर राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे. एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा ७ ते ८ खोल्या आहेत. राहण्याची सोय विनाशुल्क आहे.

असे जाता येईल..

पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाड गावातून रायगडचा दोरवाटेचा (रोप वेचा) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायऱ्या चढून गेले, की रायगडमाथा गाठता येतो. या पाचाड खिंडीतच रायगडाचा विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांचा चढणीवर एक गुहा देखील आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *