प्रियांकापेक्षाही ‘हॉट’ आणि सुंदर दिसते तिची सासू, दोघांमध्ये आहे फक्त इतक्या वर्षांचा फरक

प्रियांकापेक्षाही ‘हॉट’ आणि सुंदर दिसते तिची सासू, दोघांमध्ये आहे फक्त इतक्या वर्षांचा फरक

वर्ष 2018 मध्ये अमेरिकन पॉप गायक निक जोनसशी लग्नानंतर प्रियंका चोप्रा आता अमेरिकेत स्थायिक झाली आहे. जरी ती परदेशात रहात असली तरी तिला भारत देशाबद्धल खूप आपुलकी आहे. आणि ती बर्‍याचदा भारतात येते. पण कोरोना लॉकडाऊनमुळे प्रियंका आणि निक दोघेही आपल्या कुटूंबासह अमेरिकेत आहेत. दरम्यान, प्रियंका चोप्राने नुकतीच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केली आहेत, जी खूप व्हायरल होत आहेत. चला तर मग आपण माहित करून घेऊ की, प्रियंकाच्या या फोटोंमध्ये काय खास आहे…

वास्तविक, प्रियंकाने तिच्या सासूबरोबर वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन एक फोटो शेयर केला आहे. तीच्या सासू डेनिस जोनास यांच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी फोटो शेअर करताना असे लिहिले आहे की हॅपी बर्थडे ममी जी ! प्रेम आणि आपुलकीबद्दल धन्यवाद. प्रियांकाने लिहिले की, या विशेष दिवशी आम्ही तुमच्याबरोबर उपस्थित असल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. दरम्यान प्रियंका आणि तिची सासू डेनिस जोनास बद्दल एक मनोरंजक गोष्ट समोर येत आहे, हे जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

प्रियांकाचे वय आणि सासू-सासरे यांच्यात किती अंतर आहे हे जाणून घ्या…

आपल्या हे लगेच लक्षात येईल की प्रियंका आणि तिच्या सासू डेनिस जोनास यांच्या वयात फक्त 16 वर्षांचा फरक आहेत आणि प्रियंका तीच्या सासुपेक्षा फक्त 16 वर्षांनी लहान आणि तरी देखील दोघेही सासू आणि सून देवराणी -जेठानी दिसतात. प्रियांका निक जोनासपेक्षा वयाने मोठी असून चक्क 10 वर्षाने मोठी आहे, तर तिच्या सासूपेक्षा 16 वर्ष लहान आहे.

प्रियांका 18 जुलै रोजी 38 वर्षांची झाली, तर तिची सासू डेनिस 54 वर्षांची झाली आहे. प्रियांकाची सासू डेनिस सौंदर्याच्या बाबतीत तिची सून प्रियंका चोप्रापेक्षा दिसायला कमी नाही. प्रियंका आणि डेनिसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, जे त्यांच्या चाहत्यांनाही पसंत आहे. डेनिस जोनासबद्दल बोलायच झाल तर, ती व्यवसायाने शिक्षक आहे.

डेनिस जोनास यांना भारतीय संस्कृती आवडते…

प्रियंका आणि निकच्या रिंग सेरिमनी आणि लग्न सोहळ्यासाठी डेनिस भारतात आली होती. अमेरिकेची डेनिस जोनास भारतात आली होती आणि भारतीय संस्कृती बघून त्यांनी पाश्चात्य संस्कृतीचा त्याग केला आणि भारतीय संस्कृतीचा स्वीकार करून खूप आनंद लुटला. असे म्हणतात की त्यांना भारतीय संस्कृती खूप आवडली. डेनिस साडी आणि शूट सारख्या भारतीय वेशभूषेत भारतात दिसली होती.

यापूर्वी, डेनिस जोनास प्रियांका चोप्राच्या सगाई दरम्यान मधू चोप्रासोबत अनेक भारतीय गाण्यांवर एन्जॉय करताना एंगेजमेंट पार्टीमध्येही दिसली होती. या दोघांनीही पंजाबी गाण्यांवर ताल धरत बरीच नृत्य केले. नंतर याचा एक व्हिडिओ डेनिस जोनास यांनी सोशल मीडियावरही शेअर केला होता.

जोनास कुटुंब किती मोठे आहे ते जाणून घ्या …

निक जोनासच्या कुटूंबाबद्दल बोलताना, जोनास कुटुंबात निक यांच्यासह 4 भाऊ आहेत. यातील सर्वात मोठे म्हणजे केव्हिन जोनास, जो 32 वर्षांचा आहे. यानंतर जो जोनास (30 वर्षे), निक जोनास (27 वर्षे) आणि फंकी जोनास (19 वर्षे) यांचा क्रमांक लागतो. केवळ निक जोनासच नाही तर हे चारही भाऊ अमेरिकन अभिनेते आणि गायक आहेत.

सर्वात मोठा भाऊ केविन जोनास यांच्या पत्नीचे नाव डॅनियल आहे, तर जो यांच्या पत्नीचे नाव सोफी टर्नर आहे. सोफी जोनास यावेळी गर्भवती आहे आणि लवकरच ती आई होईल. प्रियंका चोप्राबद्दल सांगायचे तर जेव्हा तिने 2000 साली मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकले तेव्हा तिचा नवरा निक जोनास अवघ्या 8 वर्षाचा होता आणि त्यावेळी तो तिसरीच्या वर्गात शिकत होता.

टीव्ही मालिका क्वांटिकोच्या सेटवर निक आणि प्रियांकाची पहिली भेट एका कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली. यानंतर या दोघांमध्ये खोल मैत्री वाढली आणि हळूहळू ही मैत्री प्रेमात परिवर्तीत झाली. जेव्हा गाला कार्यक्रमादरम्यान दोघे एकमेकांचा हात धरत असताना दिसले तेव्हा त्यांचे नातं प्रकाशात आले. वर्कफ्रंटबद्दल बोलतांना, प्रियंका आगामी काळात मॅट्रिक्स 4 मध्ये दिसणार आहे, अमेरिकेत या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *