मराठीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या प्रवीण तरडेंची पत्नी आहे ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

मराठीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या प्रवीण तरडेंची पत्नी आहे ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

मुळशी पॅटर्न चित्रपटामधून मराठी चित्रपट श्रुष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक, लेखक म्हणून नावारूपाला येणारे प्रवीण तरडे यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी. प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट चांगलाच गाजला.

सत्याची जाण करून देणारा मुळशी पॅटर्न हा चित्रपट होता. या चित्रपटात प्रवीण तरडे यांची भूमिका छोटी असली तरी खूप महत्त्वाची होती म्हणून या चित्रपटातील त्याचे अभिनयाचे विशेष कौतुक झाले. प्रवीण तरडे सद्या मराठीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत.

पण आज आपण त्यांच्या पत्नीबद्दल बोलणार आहोत. त्यांच्या पत्नीचे नाव स्नेहल आहे. प्रवीण तरडे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील शेतकरी आहेत. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला अभिमान असल्याचं ते आवर्जून सांगतात.

आपल्या पत्नीसाठी प्रवीण सोशल मीडियावर अनेकदा रोमॅण्टिक पोस्ट लिहितात. 2 डिसेंबर 2009 साली प्रवीण तरडे व स्नेहल यांनी लग्नगाठ बांधली. दहा-बाय-दहाच्या खोलीत सुरु झालेला संसार तू थ्री बीएचकेसारखा मिरवलास. मग तुझ्याच पायगुणामुळे नंतर सगळं चित्रच बदललं, अशा शब्दांत प्रवीण तरडे यांनी पत्नीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहलसुद्धा अभिनेत्री आहे.स्नेहल ने प्रवीण तरडे सोबत काही नाटकात काम केलं आणि त्यासाठी तिला पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याचबरोबर स्नेहल न प्रवीण सोबत काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे त्यात, देऊळबंद, चिंटू 2 आणि व्हेंटिलेटर.

प्रवीण तरडे यांचे संपूर्ण शिक्षण पुण्यात झाले. त्यानंतर रंगमंचावर काम केल्यानंतर ते मालिका आणि चित्रपटांमध्ये आपले करियर करण्याचे त्यांनी ठरवले. करिअरच्या सुरुवातीला प्रवीण तरडे यांनी कुंकू या मालिकेसाठी तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं होतं. ही मालिका सुपरहिट ठरली होती. प्रवीण आणि स्नेहलला एक मुलगा आहे.

प्रवीण तरडे आता लवकरच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या चित्रपटाची कथा,सवांद, दिग्दर्शन स्वतः प्रवीण तरडेच करत आहेत. तस या चित्रपटाचे पोस्टर प्रवीण यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *