मूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका!

मूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका!

मराठी कलाविश्वातील सर्वाधिक चर्चेचा ठरलेला चित्रपट म्हणजे ‘मुळशी पॅटर्न’. लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला. ‘शहरे कशी वाढली आहेत हे शहरात राहून नाही कळत. त्यासाठी वरून पाहायला हवे’, अशा वाक्याने सुरुवात होणाऱ्या या चित्रपटाची चर्चा केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही झाली. त्यामुळेच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याचा निर्धार भाईजान अर्थात सलामान खानने केला आहे. ‘पिंकव्हिला’नुसार, लोकप्रिय ठरलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा लवकरच रिमेक येत असून यात सलमान खान आणि आयुष शर्मा स्क्रीन शेअर करणार आहेत. विशेष म्हणजे मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये सलमान खान झळकणार असल्यामुळे या आगामी चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. यामध्ये चित्रपटाचं नाव काय असेल हे जाणून घेण्यात प्रेक्षक खऱ्या अर्थाने उत्सुक आहेत. काय आहे चित्रपटाचं नाव?‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेकचं नाव ‘धाक’ असं ठेवण्यात आलं आहे. सलमानला चित्रपटाच्या नावाचे राइट्स मिळाले होते. त्यामुळे या चित्रपटाचं नाव मुळशी पॅटर्नच ठेवण्यात येईल असं वाटलं होतं.
मात्र सलमानने चित्रपटाचं नाव बदलून ‘धाक’ असं ठेवलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये आयुष गॅगस्टरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे या भूमिकेच्या माध्यमातून आयुषच्या अभिनयाची नवी बाजू प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सलमान कोणती भूमिका साकारणार?सलमानला या चित्रपटाची कथा प्रचंड आवडली असून त्याने या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दरम्यान ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामध्ये अभिनेता उपेंद्र लिमये याने पोलिसांची भूमिका साकारली होती.

दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान आणि आयुष पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘लव्हरात्री’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ‘धाक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करत असून सलमान आणि आयुषसोबत अभिनेत्री पूजा हेगडे स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या तरी हा चित्रपट १३ मे २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं चर्चा आहे.

काय आहे चित्रपटाचं नाव?‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेकचं नाव ‘धाक’ असं ठेवण्यात आलं आहे. सलमानला चित्रपटाच्या नावाचे राइट्स मिळाले होते. त्यामुळे या चित्रपटाचं नाव मुळशी पॅटर्नच ठेवण्यात येईल असं वाटलं होतं. मात्र सलमानने चित्रपटाचं नाव बदलून ‘धाक’ असं ठेवलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये आयुष गॅगस्टरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे या भूमिकेच्या माध्यमातून आयुषच्या अभिनयाची नवी बाजू प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सलमान कोणती भूमिका साकारणार?सलमानला या चित्रपटाची कथा प्रचंड आवडली असून त्याने या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दरम्यान ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामध्ये अभिनेता उपेंद्र लिमये याने पोलिसांची भूमिका साकारली होती.

दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान आणि आयुष पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘लव्हरात्री’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ‘धाक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करत असून सलमान आणि आयुषसोबत अभिनेत्री पूजा हेगडे स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या तरी हा चित्रपट १३ मे २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं चर्चा आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *